परभणी, 31 जुलै (हिं.स.)। अधीक्षक कार्यालय परभणी येथे २५२ निवासस्थानांच्या बांधकाम प्रकल्पाचा पायाभरणी व बांधकाम शुभारंभ समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा प्रारंभ श्री. शाहाजी उमाप (भा.पो.से.), पोलिस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी (भा.पो.से.), पोलिस अधीक्षक परभणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे संयोजन श्री. सुरज भाऊसाहेब गुंजाळ (भा.पो.से.), अपर पोलिस अधीक्षक परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तसेच यावेळी श्री. अनिरुद्ध काकडे, पोलिस उप अधीक्षक (गृह) परभणी, श्री. रवी बानते, रा.पो.नि. पो.मु. परभणी, अन्वर शेरदिल पठाण, बां.लि.पो.अ.का. परभणी, आणि श्री. कौशल देशमुख, प्र.अ. म.रा.पो.नि व क.म. यांची उपस्थिती होती. या उपक्रमामुळे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवासाच्या सुविधेत मोठी भर पडणार असून, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे. परभणी पोलिस दलातील हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis