छत्रपती संभाजीनगर, 31 ऑगस्ट (हिं.स.)। राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या फुलंब्री तालुक्यातील गिरसावळी येथील सभागृहाचा लोकार्पण सोहळा फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी त्यांनी गिरसावळी येथे श्री गणरायाची आरती व पूजन करून आशीर्वाद घेतला. या सभागृहामुळे गावातील नागरिकांना सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे समाधान आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाथ्रीकर, सर्जेराव मेटे, राजेंद्र डकले, ऐश्वर्याताई गाडेकर, देवीदास गाडेकर,अरुण गाडेकर, प्रदीप कोंडके, रोहित तरटे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis