जालन्यात ऊसतोड कामगाराची ट्रॅक्टर ट्रॉली चोरणाऱ्या आरोपीकडुन 6.65 लाखांचा मुद्येमाल जप्त
जालना, 31 जुलै (हिं.स.)। जालना दिनांक 28/07/2025 रोजी फिर्यादी हे त्यांचे मालकीचे महिंद्रा अर्जुन 555 ट्रॅक्टर व लाल रंगाची उसतोडींनी करणे करीता लागणारी ट्रॅक्टरची ट्रॉली ही त्यांची मौजे हातवण शिवारातील शेत गट क्रमांक 105 मध्ये नेहमी प्रमाणे उभी करु
उसतोड कामगाराची ट्रॅक्टरची ट्रॉली व मोबाईल चोरणाऱ्या आरोपीकडुन 06 लाख 65 हजार रुपयाचा मुद्येमाल केला जप्त  आरोपीस मौजपुरी पोलीसांनी केले जेरबंद


जालना, 31 जुलै (हिं.स.)।

जालना दिनांक 28/07/2025 रोजी फिर्यादी हे त्यांचे मालकीचे महिंद्रा अर्जुन 555 ट्रॅक्टर व लाल रंगाची उसतोडींनी करणे करीता लागणारी ट्रॅक्टरची ट्रॉली ही त्यांची मौजे हातवण शिवारातील शेत गट क्रमांक 105 मध्ये नेहमी प्रमाणे उभी करुन ठेवलेले होते. रात्री नेहमी प्रमाणे गुरांना चारा वैरण करुन ते घरी गेले होते व तेथे आखाड्यावर काम करणारे तीन मुले झोपलेले असतांना त्यांचे मोबाईल व फिर्यादीची ट्रॅक्टरची ट्रॉली कोणीतरी अज्ञात इसमान चोरुन नेली. अशा आशयाच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे मौजपुरी जि. जालना येथे कलम 303(2) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर घटनाक्रम समजावुन घेतला व गुन्हयांचे तांत्रिक विश्लेषण करुन नमुद गुन्हयात संशयित शिवाजी पुंजाराम खोमणे रा. भाटेपुरी यास तपासकामी ताब्यात घेऊन विचारपुस करता त्यांने सदर चोरी केलेला मुद्यमाल हा बीड जिल्हातील वडवणी येथे ठेवला असल्याचे सांगुन त्यांने सदर चोरी ही त्याचा साथीदार परमेश्वर ऊर्फ लहानु रघुनाथ चंद रा. मांडवा ता.जि. जालना याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याने जिल्हा बीड येथील वडवणी येथे जाऊन सदर गुन्हयातील त्याचा साथीदार व चोरी गेलेला मुद्येमाल आरोपीतांच्या ताब्यातुन ट्रॅक्टरची ट्रॉली व मोबाईल असा एकुण 06 लाख 65 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.

आरोपीना नमुद गुन्हयात अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीची दोन दिवस पोलीस कोठडी मंजुर केलेली असुन आरोपीतांकडुन अन्य वाहन चोरीचे गुन्हे उघडकिस येतात काय ? याबाबत सखोल तपास करीत आहोत.

---------------

हिंदुस्थान समाचार / KULKARNI AMIT ANIL


 rajesh pande