खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांचा स्वत:च्याच दाव्यावर युटर्न
पुणे, 31 जुलै, (हिं.स.)। खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या दाव्यावर आता युटर्न घेतलाय. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुषांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीय. तर दोन तरुणींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलीय.
खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांचा स्वत:च्याच दाव्यावर युटर्न


पुणे, 31 जुलै, (हिं.स.)। खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या दाव्यावर आता युटर्न घेतलाय. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुषांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीय. तर दोन तरुणींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलीय. प्रांजल यांच्या वकिलांकडून पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. यातच आता पोलिसांनी केलेल्या दाव्यांमधला फोलपणा उघड झालाय. पोलिसांनी स्वत:च्याच दाव्यावर युटर्न घेतला आहे.

पोलिसांनी सुरुवातीला रेव्ह पार्टी प्रकरणी छापा टाकलेल्या हॉटेल परिसरात तीन तरुणी संशयास्पदरित्या दिसल्याचं म्हटलं होतं. आता पोलिसांनी त्या तिघींचा पार्टीशी काहीच संबंध नसल्याचं म्हटलंय. पोलिसांनी दिलेल्या या माहितीमुळे कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे पोलिसांनी रविवारी पहाटे खराडीत छापा टाकत कारवाई केली होती. यात खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक केलीय. यात कोकेनसदृश्य पदार्थ, ७० ग्रॅम गांजाही जप्त केला गेला. तसंच या हॉटेलमध्ये पार्टीसाठी बूकिंग प्रांजल खेवलकर यांच्या नावाने करण्यात आलं होतं.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande