अहिल्यानगर, 4 जुलै, (हिं.स.)। भारतीय जनसंसद या संस्थेच्या वतीने त्याचे जिल्हा अध्यक्ष सुधीर राजाराम भद्रे याने बाहेरील जिल्ह्यातून अहिल्यानगरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांविषयी आक्षेपार्ह आणि भेदभावपूर्ण समाजात तेढ निर्माण करणारी,सामाजिक सलोखा धोक्यात आणणाऱ्या विधानांबद्दल कायदेशीर कारवाई होणे बाबत आज निवासी उपजिल्हाधिकारी गीते यांना अक्षय संजय कोळी रा. चिचोंडी पाटील यांनी निवेदन दिले आहे. यावेळी सरपंच शरद पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे कि, उपरोक्त विषयी सविनय अर्ज करितो की,बाह्य जिल्ह्यातून गुंतवणुकी साठी येणाऱ्या नागरिकांवर संशय घेऊन, त्यांना संशयित ठरविणे, त्यांच्या वर तपासाची मागणी करणे हे न्यायनिष्ठतेच्या तत्वांना छेद देणारे आहे.भारतीय संविधानाचा अनुच्छेद 14 सर्व नागरिकांना समानतेचा हक्क प्रदान करतो. कोणत्याही व्यक्तीस केवळ त्याच्या मूळ जिल्हा अथवा राज्याच्या आधारे भेदभावास सामोरे जावे लागणे हे घोर संविधान विरोधी आहे.अनुच्छेद 19(1)(e) आणि (g) नुसार भारतातील कोणताही नागरिक देशाच्या कोणत्याही भागात राहण्याचा आणि व्यवसाय करण्याचा हक्क राखतो. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी मालमत्ता खरेदी करणे हा त्यांच्या मूलभूत हक्कांचा एक भाग आहे.बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना रोहिंग्या, पाकिस्तानी किंवा बांगलादेशी घुसखोर असल्यासारखे भासवून, त्यांच्या बद्दल अपमानास्पद टिप्पणी करणे, समाजात भय ,सामाजिक तेढ वाढविणे व अफवा पसरवणे,अशा प्रकारची माहिती वर्तमान पत्रात प्रसिद्ध करून त्याचा अपप्रचाराच्या स्वरूपात पसरवून, समाजातील वातावरणात संशय, अविश्वास आणि भीती निर्माण केली जात आहे हा समाजविघातक प्रकार आहे.बाहेरील तालुक्यातील व्यक्तींची प्रतिमा हेतुपुरस्सर मलिन करण्याचा एक गंभीर प्रयत्न आहे.कलम 370 (या कलमा नुसार काश्मीर मध्ये बाहेरील नागरिकांना जमीन घेणे बेकायदेशीर होते) तसे अहिल्यानगर मध्ये लागू करण्याची सुधीर भद्रे याची इच्छा आहे का ? जर भद्रे याच्या काही विशिष्ट तक्रारी असतील, तर त्यांनी निवडक आणि स्पष्ट स्वरूपात त्या तक्रारी संबंधित प्रशासकीय अथवा पोलीस यंत्रणेकडे सादर करणे अपेक्षित आहे. बाहेरील जिल्ह्यातून येणारे नागरिक हे देखील या देशाचेच नागरिक असून, त्यांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे हे प्रशासकीय यंत्रणेचे कर्तव्य आहे.कायदेशीर हक्कानुसार प्रतिष्ठेने जगणाऱ्या नागरिकांची प्रतिमा कलुषित करण्या साठी करण्यात आलेली आक्षेपार्ह, जातीय, प्रांतीय तेढ निर्माण करणारी व सामाजिक शांतता भंग करणाऱ्या कारणीभूत ठरणारी, काही विशिष्ट गटांविरुद्ध गैरसमज पुरवणारी विधाने प्रसिद्ध करणे याचे परिणाम अत्यंत गंभिर ठरतील काही ठराविक लोकांवर दबाव दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे पत्र व्यवहार केल्याचे दिसते. शेजारील जमीन धारकांना धर्म, जाती, गाववाला, बाहेर वाला अशा अनेक प्रकारे दबाव निर्माण करून त्यांच्या जमिनी बळकावल्यच्या अनेक तक्रारी ग्रामपंचायती कडे यापूर्वी आलेल्या आहेत, सुधीर भद्रे याने चिचोंडी पाटील गावात व बीड जिल्ह्यातील लोणी, सालेवडगाव,दौलवडगाव येथील नागरिकांना त्रास देऊन तेथे त्यांच्या जमिनी बळकव लेल्या आहेत, त्यासंदर्भात लेखी पुरावे व तहसीलदारांचे निकालही झालेले आहेत व गावातही बाहेर जिल्ह्यातील लोकांना जमिनी घेऊन दिलेल्या आहेत,तेही भारतीय जनसंसद या संघटनेशी संबंधित आहेत व त्या नुसार मी आपणाला ही लेखी तक्रार देत आहे.आपणास विनंती आहे की, अर्जदाराचा अर्ज करण्याचा हेतूचा सखोल तपास करावा व बेकायदेशीर मागण्या करणाऱ्या भारतीय जनसंसद या स्वयंघोषीत बनावट लूटारू संघटनेवर बंदी घालावी व त्याच्या पदाधिकाऱ्यांवर व कायदेशीर कारवाई करावी व सदर निवेदनावर सहया करणाऱ्या व्यक्तींकडून खुलासा घेऊन गुन्हे दाखल करावेत तसेच अशी अविचारी तसेच कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणार्या मागण्या करणारी संघटना ही बोगस संघटना तर नाही ना याचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni