भारत विरुद्ध बांगलादेश वन डे मालिका रद्द?
मुंबई, 4 जुलै (हिं.स.)।भारतीय संघातील दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑगस्ट महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या वन डे मालिकेत खेळताना दिसण्याची शक्यता होती. पण, आता भारतीय संघाचा बांगलादेश दौरा प्रभावीपणे रद्द झाला आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोष
India vs Bangladesh


मुंबई, 4 जुलै (हिं.स.)।भारतीय संघातील दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑगस्ट महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या वन डे मालिकेत खेळताना दिसण्याची शक्यता होती. पण, आता भारतीय संघाचा बांगलादेश दौरा प्रभावीपणे रद्द झाला आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) पुढील महिन्यात नियोजित असलेल्या मालिकेची तयारी थांबवली आहे. दोन्ही देशांमधील बिघडलेले राजनैतिक संबंध याचा परिणाम असल्याचे समजते.

बीसीबीने मीडिया हक्कांची विक्री थांबवल्यानंतर हा दौरा रद्द होण्याचे किंवा पुढे ढकलण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. पण, भारताविरुद्धची ही मालिका पुढे होईल, अशी बीसीबीला आशा आहे. आम्ही तोडगा काढण्याचा विचार करत आहोत. घाई करण्यात काही अर्थ नाही. आम्ही वेगवेगळे करार देऊ शकतो, असे बीसीबीच्या एका अधिकाऱ्याने ढाका येथून सांगितले. बीसीबी ने जुलै २०२५ ते जून २०२७ पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी मीडिया हक्क विकण्याची योजना आखली होती. मात्र, आता ते फक्त पाकिस्तानविरुद्धच्या तीन ट्वेंटी-२० ( १७ ते २५ जुलै) आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी हक्क विकण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे.

या मीडिया हक्कांमध्ये भारताची मालिका नाही, असे त्यांनी आम्हाला सांगितले. निविदा जाहीर केल्यानंतर, त्यांनी आयटीटी (Invitation to Tender) उपलब्ध करून दिले नाही. ते सध्या फक्त पाकिस्तान मालिकेसाठी मीडिया हक्क विकत आहेत, असे एका भारतीय प्रसारकाने सांगितले.

भारत मालिकेची तारीख अजून निश्चित झालेली नाही,असे बीसीसीआयने सांगितले की टीम इंडिया ऑगस्टमध्ये येणे कठीण आहे. हा एफटीपी (Future Tours Program) चा भाग आहे, असे बीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी या मालिकेबद्दल कोणतीही निश्चित भूमिका घेतली नाही, परंतु एका अधिकाऱ्याने सांगितले की एका आठवड्याच्या आत निर्णय अपेक्षित आहे.भारताला १७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान तीन वन डे आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे होते.

बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासोबत क्रिकेटचे संबंध तोडण्यात यावे, अशी मागणी आहे. कोणत्याही बाजूने अधिकृत माहिती आली नसली तरी, राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बीसीसीआयला हा दौरा पुढे न नेण्याचा सल्ला दिला असल्याचे मानले जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande