अहिल्यानगर : चॅम्पियन करंडक स्पर्धेत मराठा वॅरिअर संघ विजयी
अहिल्यानगर, 4 जुलै (हिं.स.)। वाकोडी येथील साईदीप अकॅडमीवर गेले 15 दिवस चाललेल्या चॅम्पियन करंडक सामन्यात मराठा वॉरिअर संघाने समर्थ अकॅडमी संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. मराठा वॉरियर संघाने प्रथम फलंदाजी करताना 40 षटका मध्ये 8 ब
साईदीप हिरोज आयोजित चॅम्पियन करंडक स्पर्धेत मराठा वॅरिअर संघ विजयी


अहिल्यानगर, 4 जुलै (हिं.स.)। वाकोडी येथील साईदीप अकॅडमीवर गेले 15 दिवस चाललेल्या चॅम्पियन करंडक सामन्यात मराठा वॉरिअर संघाने समर्थ अकॅडमी संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

मराठा वॉरियर संघाने प्रथम फलंदाजी करताना 40 षटका मध्ये 8 बाद 291 धावा केल्या. यामध्ये करण धामणे याने तडफदार शतक झळकावले त्याने 118 धावांची खेळी केली. त्याला प्रेम इघे याने सुंदर साथ देत 80 धावांची खेळ केली. तसेच प्रिन्स कुमार याने 39 धावा करत चांगली साथ दिली. समर्थ संघाच्या आदित्य भापकर यांनी 43 धावात तीन बळी घेतले. निमेश शिदोरे याने 53 धावा देत बळी मिळवले. प्रत्युत्तर दाखल समर्थ संघाने 39.5 षटकांमध्ये सर्व बाद 188 धावा केल्या. यामध्ये सर्वाधिक धावा वरद भिसे यांनी 36 धावा केल्या. रुद्र पवार याने 28 धावा केल्या. मराठा वॉरियर कडून सार्थक शिंदे यांनी 43 धावात दोन बळी मिळवले तसेच प्रिन्स कुमार यांनी 34 धावा दोन बळी मिळवले. बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज देवाशिष संदीप घोडके याने 4 सामन्यांमध्ये 375 रन केले या स्पर्धेमध्ये देवाशिष घोडके ला उत्कृष्ट फलंदाज व सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघाने आपला सहभाग नोंदवला. ही स्पर्धा साखळी सामन्यांची केली गेली एका संघाला तीन सामने खेळल्यास मिळाले. आजच्या सामन्याला प्रमुख पाहुणे म्हणून दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष येवले व उद्योजक व स्वामी मोबाईलचे संचालक संदीप पडोळे म्हणून लाभले. फायनल सामन्याची मॅन ऑफ द मॅच फायनल : करण धामणे- 112 रन, फायनल फायटर ऑफ द मॅच आदित्य भापकर - 3 विकेट, बेस्ट फास्ट बॉलर: सार्थक शिंदे 4 मॅच 10 विकेट, बेस्ट स्पिन बॉलर : ओम देवळालीकर 5 मॅच 11 विकेट, बेस्ट फील्डर : सुमेध येणगुल , बेस्ट विकेटकीपर : प्रेम इघे यांना सन्मानित करण्यात आले, यावेळी सुभाष येवले यांनी आपल्या भाषणामध्ये खेळाबरोबर शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व व अपयशाने खचून न जाता पुढच्या सामन्याची तयारी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच संदीप घोडके यांचे ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande