अकोला : जन सत्याग्रह संघटनेच्या मागणीला यश
अकोला, 5 जुलै (हिं.स.) : मोहरमच्या पार्श्वभूमीवर ईराणी समाजाच्या पारंपरिक मातमी मिरवणुकीसाठी जन सत्याग्रह संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. अकोट फाईल इमामबाडा ते टीपू सुलतान कमान या मार्गावर अखेर मनपा प्रशासनाने मुरुम टाकण्याचे काम सुर
P


अकोला, 5 जुलै (हिं.स.) : मोहरमच्या पार्श्वभूमीवर ईराणी समाजाच्या पारंपरिक मातमी मिरवणुकीसाठी जन सत्याग्रह संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. अकोट फाईल इमामबाडा ते टीपू सुलतान कमान या मार्गावर अखेर मनपा प्रशासनाने मुरुम टाकण्याचे काम सुरू केले आहे. या कामामुळे मातम करणाऱ्यांना होणाऱ्या अडचणी कमी होतील व मिरवणूक सुस्थितीत पार पडेल. या निर्णयामुळे ईराणी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, श्रद्धाळूंनी जन सत्याग्रह संघटनेचे विशेषतः कार्यकर्ते आसिफ अहमद खान यांचे मनापासून आभार मानले आहेत. त्यांनी वेळेत प्रशासनाशी संपर्क साधून ही मागणी पूर्णत्वास नेली. तसेच, समाजाने मनपा आयुक्तांचेही आभार व्यक्त केले की त्यांनी समाजाच्या भावना समजून घेत तात्काळ पाऊल उचलले. या घटनेमुळे हे स्पष्ट झाले आहे की जर मागणी प्रामाणिक आणि लोकहितासाठी असेल, तर प्रशासन सहकार्य करण्यास तयार असते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande