अकोला जिल्ह्यात १४ वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ
अकोला, 16 मार्च (हिं.स.)।अकोला जिल्ह्यातील १४ वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ देण्यात आली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील लोणसणा, बपोरी, बाळापूर तालुक्यातील काजीखेड-2 ( हिंगणा शिकारी), मोखा, स्वरूपखेड, जानोरीमेळ, तेल्हारा तालुक्यातील वांगरगाव आदी ७
अकोला जिल्ह्यात १४ वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ


अकोला, 16 मार्च (हिं.स.)।अकोला जिल्ह्यातील १४ वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ देण्यात आली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील लोणसणा, बपोरी, बाळापूर तालुक्यातील काजीखेड-2 ( हिंगणा शिकारी), मोखा, स्वरूपखेड, जानोरीमेळ, तेल्हारा तालुक्यातील वांगरगाव आदी ७ वाळूघाटांना तेरावी मुदतवाढ देण्यात आली आहे.

अकोला तालुक्यातील कपिलेश्वर, एकलारा, उगवा, तसेच बाळापूर तालुक्यातील बहादूरा, सागद, नागद, मांजरी या ७ वाळूघाटांच्या ई-लिलावाला पंधरावी मुदतवाढ देण्यात आली आहे.या वाळूघाटांच्या ऑनलाईन ई-निविदा दि. २३ मार्चला दु. 12 वा. पर्यंत स्वीकारण्यात येतील. तांत्रिक लिफाफा व त्यानंतर आर्थिक लिफाफा दि. २४ मार्चला उघडण्यात येईल. ई-लिलाव प्रक्रिया दि. २५ मार्चला सकाळी १० ते दु. १ वा. दरम्यान होईल, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी विशाल धांडे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande