अकोला, 5 जुलै (हिं.स.) : अकोला मनपा हद्दीतील सर्व प्रभागामध्ये जनतेच्या आरोग्यासाठी मनपा च्या वतीने हॉस्पिटल उघडून त्यामधून दररोज ओ पी डी सुरु करा, मनपा च्या सर्व शाळांमध्ये डिजिटल एल ई डी बोर्ड, टेबल खुर्ची बेंच, पंखे, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह,आणि सुशोभीत परिसराची निर्मिती करा, हद्दवाढ झालेल्या प्रभागात सिमेंट रस्ते आणि नाल्या तयार करा, शहरातील नागरिकांना दररोज किंवा एका दिवसाआड पाणी पुरवठा करा,10 हजार रुपयांच्या वर घर टॅक्स असलेल्या नागरिकांना इन्स्टोलमेंट पद्धत ची सवलत द्या, 2017 मध्ये लावलेला टॅक्स कमि करून पूर्वीप्रमाणे असलेल्या टॅक्स मध्ये 10 टक्के वाढ नागरिक सहन करू शकतात. त्यामुळे मनपा ने या सर्व मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात अन्यथा उद्या दि. 7 जुलै पासून मनपा कार्यालयासमोर प्रथमत साखळी उपोषण आणि मागण्या मंजूर न केल्यास आम आदमी पार्टी महानगर अध्यक्ष अल्हाद मसूद अहेमद खान यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण करण्यात येत आहे. असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. या आम आदमीला न्याय देण्यासाठी आणि अकोल्याच्या उज्वल भविष्यासाठी ग्रीन अकोला, हेल्थी अकोला वातावरण निर्माण करण्यासाठी या आंदोलनात आम आदमी पार्टी महानगर अध्यक्ष अल्हाद मसूद अहेमद खान, जिल्हाध्यक्ष कैलास प्राणजाळे,प्रदेश महासचिव अरविंद कांबळे, सुखदेवरावं गोपनारायण, रफिक, गजानन बुडूकले, प्रा. प्रदीप कुमार गवई, आकिब खान, अशोक शेगोकार, श्रावण रंगारी, प्रकाश सिरसाट, माणिकराव मोरे, व पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे