न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, आणीबाणी जाहीर
वॉशिंग्टन, 1 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर गुरुवारी(दि.३१) जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे पूर आल्याने न्यूयॉर्क शहर आणि न्यूजर्सीमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने लोकांना प्रवास न करण्याचा आणि पूर टाळण्याचा सल्ला दिला आ
न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये पूरस्थिती


वॉशिंग्टन, 1 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर गुरुवारी(दि.३१) जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे पूर आल्याने न्यूयॉर्क शहर आणि न्यूजर्सीमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने लोकांना प्रवास न करण्याचा आणि पूर टाळण्याचा सल्ला दिला आहे. या वादळाचा परिणाम न्यू यॉर्कपासून वॉशिंग्टन डीसीपर्यंत दिसून आला.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, काही भागात एका तासात ३ इंच (७.६ सेमी) पर्यंत पाऊस पडला, ज्यामुळे नाले आणि नद्या ओसंडून वाहत होत्या. यामुळे न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांनी शहर आणि आसपासच्या भागात आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. शुक्रवारपर्यंत आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने प्रशासनाने लोकांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.

न्यूयॉर्कमध्ये, सबवे स्टेशन्सना पाणी आले होते. स्टेशनच्या भिंतींमधून पाणी गळत असल्याचे दिसून आले. मुसळधार पावसामुळे ट्रॅक पाण्यात बुडाले होते, त्यामुळे अनेक गाड्या आणि प्रवासी अडकले होते. बचाव पथकांनी प्रवाशांना वाचवले. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक वाहने बुडाली आणि एक्सप्रेस वे बंद करावा लागला. त्याच वेळी, न्यूजर्सीमधील १४ हजारांहून अधिक लोक २४ तास वीजेशिवाय राहिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande