पाकिस्तानात ५.१ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
इस्लामाबाद, 3 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रविवारी (३ ऑगस्ट) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटर (एनएसएमसी) नुसार या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केलवर नोंदवली गेली. हे झटके शनिवारी व रविवारीच्या द
पाकिस्तान भूकंप


इस्लामाबाद, 3 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रविवारी (३ ऑगस्ट) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटर (एनएसएमसी) नुसार या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केलवर नोंदवली गेली. हे झटके शनिवारी व रविवारीच्या दरम्यान मध्यरात्री १२:१० वाजता जाणवले, ज्यामुळे घाबरलेले लोक घराबाहेर धावत आले.

पाकिस्तानच्या नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटर नुसार, या भूकंपाचे केंद्र रावतपासून १५ किमी दक्षिण-पूर्वेला होते आणि त्याची खोली केवळ १० किमी होती. भूकंपाचा प्रभाव खैबर पख्तूनख्वा, इस्लामाबाद, रावळपिंडी आणि आसपासच्या अनेक भागांमध्ये जाणवला गेला. इस्लामाबाद आणि रावळपिंडीसोबतच मर्दान, मुर्री, हरिपूर, चकवाल, ताला गंग आणि कलर कहारपर्यंत हे झटके जाणवले गेले. रिपोर्टनुसार, लोक उशिरापर्यंत noउघड्यावर राहिले कारण त्यांना आफ्टरशॉक्स (भूकंपानंतर येणारे झटके) येण्याची भीती होती.

शनिवारीदेखील ५.४ तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचे केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदुकुश पर्वतीय भागात होते. एनएसएमसीने सांगितले की , त्या भूकंपाचे झटके पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानच्या अनेक भागांमध्ये जाणवले गेले. खैबर पख्तूनख्वा भागात शनिवारी(दि.२) जे झटके जाणवले, ते पेशावर, स्वात, मलकंद, नौशेरा, चारसद्दा, करक, दीर, मर्दान, मोहम्मद, शांगला, हंगू, स्वाबी, हरिपूर आणि एबटाबाद या भागांमध्ये होते. त्याचप्रमाणे, इस्लामाबाद, रावळपिंडी, लाहोर, अटॉक, टेक्सिला, मुर्री, सियालकोट, गुजरांवाला, गुजरात, शेखुपुरा, फिरोजवाला आणि मुरिदके या भागांमध्येही हे झटके जाणवले.

आत्तापर्यंत या दोन्ही भूकंपांमुळे कोणतीही जीवित वा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि संभाव्य आफ्टरशॉक्सबाबत ते सतर्क आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande