सिंधुदुर्ग, 2 ऑगस्ट (हिं.स.) दोडामार्ग तालुक्यातील सासोली पाटये पुनर्वसन येथील रहिवाशी व निवृत्त नायब तहसीलदार सत्यवान गवस यांचा मुलगा शिरीष सत्यवान गवस, वय 33 यांचं शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. रेड सॉईल स्टोरी या नावाने सोशल मिडीयावर प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाचा एकच धक्का बसला. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, पत्नी, एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे.
त्यांच्या निधनानंतर त्यांच्या गावी म्हणजे सासोली पाटये येथे घरी सोशल मीडिया सेलिब्रेटी यांनी अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रूचा बांध फुटला.
शिरीष यांचे वडील महसूल विभागात कामाला होते. प्रथम देवगड येथे व नंतर कणकवली येथे तहसील कार्यालयात कामाला असल्याने ते तिकडे स्थायिक झाले होते. त्यांचा मुलगा ही त्यांच्या बरोबर कणकवली येथे राहत होता. मध्यंतरी कोरोनाच्या काळात ते आपल्या मूळ गावी सासोली पाटये येथे राहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या वडिलांची दोडामार्ग तहसील कार्यालय येथे बदली झाले. त्या दरम्यान शिरीष यांचं लग्न ठरले. पत्नी पूजा हिच्या सोबत ते आपल्या मूळ गावी सासोली पाटये पुनर्वसन येथे राहत होते.
'रेड सॉईल स्टोरी'तून खाद्य संस्कृतीची ओळख
कोरोना काळात शिरीष आणि पूजा गवस यांनी मुंबईतील नोकरी सोडून कोकणात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि 'रेड सॉइल स्टोरीज' सुरू केले. त्यांनी मुंबईतील नोकरी सोडून गावात स्थायिक होऊन, तेथील पारंपरिक जीवनशैली, खाद्यसंस्कृती आणि निसर्गाचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या चॅनलच्या माध्यमातून केले. अल्पवधीत त्यांनी या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
1 वर्षापूर्वी झालं होतं कन्यारत्न
गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये त्यांना एक मुलगी झाली. तीच नाव श्रीजा. तिचा वाढदिवस त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला होता. हाच व्हीडीओ त्यांच्या सोशल मिडियावरील शेवटचा व्हीडीओ दिसतोय.शिरीष गवस यांच्या अचानक जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळलाय.
हिंदुस्थान समाचार / Prasad p