रत्नागिरी, 1 ऑगस्ट, (हिं. स.) : येथील उज्ज्वला क्लासेस या वाणिज्य शाखेतील अग्रगण्य कोचिंग इन्स्टिट्यूटकडून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधून खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सौरीश कशेळकर विजयी झाला.
स्पर्धेच्या उद्घाटनाला सीए दीपाली पाध्ये, सीएस पुरुषोत्तम पाध्ये, सीए शरदचंद्र वझे उपस्थित होते. स्पर्धेत एकूण 92 स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातील 15 खेळाडू आंतरराष्ट्रीय फिडे मानांकनप्राप्त खेळाडू होते.
सात फेऱ्यांच्या साखळी पद्धतीने ही स्पर्धा झाली. ज्यात अनिकेत रेडीज व सौरीश कशेळकर यांनी साडेसहा गुण मिळवत अपराजित राहून वर्चस्व गाजवले. सरस टायब्रेकच्या आधारे सौरीशने बाजी मारत आपले विजेतेपद पटकावले, तर अनिकेतला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
आर्यन धुळपने सहा गुण मिळवत दमदार खेळाचे प्रदर्शन केले. चिपळूणच्या श्रीहास नारकर व रत्नागिरीच्या लवेश पावसकर यांनी साडेपाच गुण मिळवत उपस्थितांची वाहवा मिळवली. त्यांना अनुक्रमे तिसरे ते पाचवे पारितोषिक मिळाले.
स्पर्धेला पंच म्हणून विवेक सोहनी व चैतन्य भिडे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उज्ज्वला क्लासेसचा कर्मचारीवर्ग व जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला सीए कपिल लिमये, सीए शरदचंद्र वझे, दीपाली पाध्ये व सीएस पुरुषोत्तम पाध्ये उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले
स्पर्धेचा गुणानुक्रमे विस्तृत निकाल असा - खुला गट : सौरीश कशेळकर, अनिकेत रेडीज, आर्यन धुळप, श्रीहास नारकर, लवेश पावसकर, अनंत गोखले, निधी मुळ्ये, कौस्तुभ हर्डीकर, प्रवीण सावर्डेकर, साईप्रसाद साळवी.
१६-३५ वयोगट : शुभंकर सावंत
३६-५५ वयोगट : राकेश जुवेकर
वरिष्ठ खेळाडू : सुनील शिंदे
महिला खेळाडू : सई प्रभुदेसाई
१५ वर्षांखालील मुले : बावधनकर शुभम, अर्णव सासवडे, विपीन सावंत
१५ वर्षांखालील मुली : तनया आंब्रे, सानवी दामले, पद्मश्री वैद्य
१२ वर्षांखालील मुले : राघव पाध्ये, आयुष अमेय रायकर, अलिक गांगुली
१२ वर्षांखालील मुली : ईश्वरी आनंद सप्रे, साची चाळके, साफिया कापडी
९ वर्षांखालील मुले : विहंग अक्षय सावंत, अर्णव गावखडकर, कपेश माईणकर
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी