लंडन, 3 ऑगस्ट (हिं.स.)
वर्ल्ड
चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ च्या दुसऱ्या हंगामागचे विजेतेपद दक्षिण आफ्रिका
चॅम्पियन्सन संघाने मिळवले आहे. अंतिम सामन्यातदक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाने पाकिस्तान
चॅम्पियन्सचा ९ विकेट्सने पराभव केला. लक्ष्याचा पाठलाग करताना फक्त ६० चेंडूत १२०
धावांची शानदार शतकी खेळी करणारा दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सचा कर्णधार एबी
डिव्हिलियर्स 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला. दोन्ही संघांमधील हा अंतिम सामना
बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर खेळवण्यात आला.
अंतिम
सामन्यात दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाने
पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध फक्त १६.५ षटकांत फक्त एक गडी गमावून १९६ धावांचे
लक्ष्य गाठून विजेतेपद पटकावले. डिव्हिलियर्सने १२ चौकार आणि ७ षटकारांसह १२०
धावांची शानदार खेळी केली. तर ड्युमिनीने ५० धावांची आकर्षक खेळी केली.
नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तान चॅम्पियन्स संघाने प्रथम फलंदाजी
करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शरजील खानने ७६ धावांची खेळी केली तर उमर अमीनने
नाबाद ३६ धावा केल्या. पाकिस्तान चॅम्पियन्सने दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्ससमोर १९६
धावांचे लक्ष्य ठेवले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra