अकोला, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
वंदे भारत एक्सप्रेस सुरू करून रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा सोबत शीघ्र गतीने पोहोचण्याची वेळेची बचत व स्वदेशी मंत्राचा प्रचार प्रसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतीने करून 150 वी गाडी याचा आनंद उत्साह हजारोच्या संख्येने उपस्थित स्वागत समारंभासाठी नागरिकांची हजेरी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची व भारतीय नागरिकांनी आत्मनिर्भरतीकडे वाटचाल सुरू केल्याची कृती असल्याचे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.
नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस अकोल्यात आगमन झाल्यावर जोरदार स्वागत करण्यात आलं. त्याप्रसंगी ते बोलत होते. त्याआधी रेल्वे स्टेशन तिकीट खिडकी समोर कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यात आला. त्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यांना पुरस्कार देण्यात आला पाच विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यांना सुद्धा वंदे भारत एक्सप्रेसचा बसण्याचा मोफत पास उपलब्ध करून देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील विविध घटकांना मोफत पास उपलब्ध करून देऊन दिला त्यांचाही सुद्धा खासदार धोत्रे स्वागत केले.
आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
रेल्वे स्टेशन परिसरात विविध कार्यक्रम झाले सतत तीन तास वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वदेशी मंत्राचा तसेच राष्ट्रभक्ती चेतनाचा जागृती करण्याचा कार्यक्रम झाले
रेल्वे स्टेशनवर पुष्पवृष्टी ढोल ताशे मिठाई वाटप करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला 5000 पेक्षा जास्त कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते जिल्हाभरातून विविध आघाडी कार्यकर्ते समाजातील विविध आघाडी तसेच व्यापारी क्षेत्र उद्योजक क्षेत्र शिक्षण क्षेत्रातील मान्यवर सुद्धा यावेळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार अनुप धोत्रे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सक्रियतेबद्दल व त्यांच्या सतत पाठपुरावामुळे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यामुळे अकोल्याला ही गाडी मिळाली अकोल्याला थांबा मिळाला शेगावला सुद्धा थांबा देण्यात आला आहे आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकले, यांच्या हस्ते इंजन ड्रायव्हर तसेच गाड्यांचा स्वागत करण्यात आलं मातु शक्ती मोठ्या संख्येने उपस्थित युवाशक्ती भारत माता की जय जय श्रीराम हर हर महादेव पंतप्रधान नरेंद्र मोदी आगे बढो खासदार धोत्रे, सावरकर, पिंपळे भारसाकळे, खंडेलवाल आगे बढो या गगनभेदी नाऱ्यांनी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर एक वर मोठ्या प्रमाणात बोगी स्वागत पुष्पवृष्टीने करण्यात आली आकर्षण आतिषबाजी ढोल ताशे या रेल्वे स्टेशन दुमदुमले धन्यवाद मोदीजी धन्यवाद धोत्रे अशा गगनभेदी नारायणी परिषद उत्साह भाजप कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे