ज्ञानेश्वर रमेश तुर्डे यांचा मनसेत प्रवेश; पोलादपूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती
पोलादपूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। धारिवली गावचे सुपुत्र, उच्च शिक्षित व विचारवंत व्यक्तिमत्त्व ज्ञानेश्वर रमेश तुर्डे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या झंझावाती विचारसरणीशी प्रेरित होऊन त्यांन
ज्ञानेश्वर रमेश तुर्डे यांचा मनसेत प्रवेश; पोलादपूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती


पोलादपूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। धारिवली गावचे सुपुत्र, उच्च शिक्षित व विचारवंत व्यक्तिमत्त्व ज्ञानेश्वर रमेश तुर्डे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या झंझावाती विचारसरणीशी प्रेरित होऊन त्यांनी पक्षात प्रवेश घेतल्याचे सांगितले.

तुर्डे यांचा पक्षप्रवेश तरुणाईसाठी नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरला असून, त्यांनी आपल्या सामाजिक लढ्याला मनसेच्या व्यासपीठावरून अधिक बळकटी देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रवेशानंतर लगेचच त्यांची मनसे पोलादपूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, ही बाब त्यांच्या नेतृत्वक्षमतेवरचा पक्षाचा विश्वास दर्शवते. तुर्डे यांनी सांगितले की, तरुणांना दिशा देणे, समाजातील गरजू घटकांसाठी आवाज उठवणे, आणि महाराष्ट्राच्या पुनर्निर्मितीसाठी योगदान देणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे.

या प्रसंगी मनसेचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष चेतनदादा उतेकर, पोलादपूर शहराध्यक्ष अनिल खेडेकर, तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर, तालुका सचिव गणेश कासुर्डे, शहर उपाध्यक्ष प्रफुल पांडे, शहर उपाध्यक्ष मुश्ताक मुजावर, महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे, तसेच मनविसेचे ओमकार मोहिरे, प्रवीण पांडे, आदेश गायकवाड, सुमित जीमन आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant


 rajesh pande