रत्नागिरी, 10 ऑगस्ट, (हिं. स.) : येथील गोविंद रानडे संस्कृत पाठशाळेतर्फे आयोजित केलेल्या स्तोत्रपठण स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.
पाचवी-सहावी (लहान गट) आणि सातवी-आठवी (मोठा गट) या दोन गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत रत्नागिरीतील फाटक प्रशाला, पटवर्धन, शिर्के, दामले, जीजीपीएस आदी शाळांमधून एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
पाचवी-सहावीसाठी शिवपंचाक्षर आणि आत्मषटक अशी २ स्तोत्रे देण्यात आली होती, तर सातवी-आठवीसाठी भवन्याष्टक आणि अच्युताष्टकम् अशी २ स्तोत्रे देण्यात आली होती.
स्वानंद स्तोत्र पठण मंडळाचा योजना घाणेकर, अश्विनी जोशी, तृप्ती करमरकर आणि स्वाती सोमण यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेतील गुणानुक्रमे यशस्वी विद्यार्थी असे - पाचवी-सहावी गट (आत्मषटकम् / शिवपंचाक्षर स्तोत्र) श्रीरंग नीलेश दामले, स्वरेशा आखाडे, मल्हार संदीप फळणीकर, उत्तेजनार्थ - स्पृहा तेजराज भावे, अर्णव अभिजित जोशी.
सातवी-आठवी (भवान्यष्टकम् -अच्युताष्टकम्) गार्गी माधव काणे, अक्ष्विता रोहित सरपोतदार, अर्णव अमर हर्डीकर, उत्तेजनार्थ - इरा उदय गोखले, अवनीश केदार वझे.
बक्षीस वितरण उद्योजक अनंत आगाशे आणि पाठशाळेचा उपाध्यक्ष प्रतिभा प्रभुदेसाई यांच्या हस्ते झाले. कल्पना आठल्ये यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम वेदशाळेच्या सभागृहात झाला. पाठशाळेचे अध्यक्ष डॉ. मंदार भिडे यांनी आभार प्रदर्शन केले. स्तोत्रपठण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पाठशाळेचे सचिव ओंकार पाध्ये यांनी विशेष परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी