शुभमन गिल आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराचा मानकरी
दुबई, 12 ऑगस्ट, (हिं.स.) शुभमन गिल गेल्या काही काळापासून खूप चांगली कामगिरी करत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने धावांचा रतीब रचायला सुरुवात केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर त्याने आपल्या फलंदाजीने कमाल करुन दाखवली होती. गिलच्या शानदार फलंदाजीमुळेच भारतीय
शुभमन गिल


दुबई, 12 ऑगस्ट, (हिं.स.) शुभमन गिल गेल्या काही काळापासून खूप चांगली कामगिरी करत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने धावांचा रतीब रचायला सुरुवात केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर त्याने आपल्या फलंदाजीने कमाल करुन दाखवली होती. गिलच्या शानदार फलंदाजीमुळेच भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राखण्यात यश मिळवलं होतं. आता त्याला आयसीसीचा जुलै २०२५ महिन्याचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार मिळाला आहे.

शुभमन गिलला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू वियान मुल्डर यांचा सामना करावा लागला होता. पण या दोघांना मागे टाकत त्याने प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला. गिलने जुलैमध्ये दमदार कामिरी केली. आणि तीन कसोटी सामन्यांमध्ये ९४.५० च्या प्रभावी सरासरीने ५६७ धावा केल्या. ज्यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे.

प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकल्यानंतर शुभमन गिल म्हणाला की, जुलैसाठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड झाल्याने मला खूप आनंद होत आहे. यावेळी ते आणखी महत्त्वाचे आहे कारण कर्णधार म्हणून माझ्या पहिल्या कसोटी मालिकेतील कामगिरीसाठी मला हा पुरस्कार मिळाला आहे. बर्मिंगहॅममध्ये झळकवलेले द्विशतक माझ्या सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक राहील. या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी परिक्षकांचे आभार मानू इच्छितो.

शुभमन गिलचा हा चौथा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार आहे. यापूर्वी, त्याने फेब्रुवारी २०२५, जानेवारी २०२३, सप्टेंबर २०२३ मध्ये हा पुरस्कार पटकावला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. शुभमन गिलने इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत एकूण ७५४ धावा केल्या. आणि चार शतके झळकावण्याचा पराक्रमही त्याने या मालिकेत केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande