नवी दिल्ली, 29 ऑगस्ट (हिं.स.) -
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 29 ऑगस्ट रोजी दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ साजरा केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताच्या विकसित होत असलेल्या क्रीडाक्षेत्राचा आढावा घेत,खेळाडूंना संस्थात्मक पाठबळ देऊन मजबूत करत तसेच देशभरातील आधुनिक प्रशिक्षण आणि स्पर्धास्थळांची उपलब्धता वाढवत;क्रीडा आणि तंदुरुस्तीची संस्कृती वाढवण्यासाठी सरकारच्या असलेल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.
आपल्या एक्स पोस्टवरील संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“राष्ट्रीय क्रीडादिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! या खास दिवशी,आम्ही मेजर ध्यानचंद जी यांना आदरांजली वाहत आहोत, ज्यांचे क्रीडापटुत्व अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे.
गेल्या दशकात,भारताच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन झाले आहे. तरुण प्रतिभेला चालना देणाऱ्या तळागाळातील कार्यक्रमांपासून ते जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यापर्यंत, आपण आपल्या देशात एक उत्साही क्रीडाक्षेत्राला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण होत असल्याचे पाहत आहोत. आमचे सरकार खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि भारताला क्रीडाक्षेत्रात उत्कृष्टतेचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी वचनबद्ध आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी