सिद्धी बुबणे, सिद्धी कर्वे, विवान सोनी, प्रेम निचळ यांची बुद्धिबळ राज्य स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। ‘अयोध्या टॉवर’ दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे अनयाज् चेस क्लब ने आयोजित केलेल्या जी एच रायसोनी स्मृती तेरा वर्षाखालील मुला-मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. याामध्य यामध्ये 21 ऑगस्ट ते 23
आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा निवडण्यात आलेला संघ


कोल्हापूर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। ‘अयोध्या टॉवर’ दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे अनयाज् चेस क्लब ने आयोजित केलेल्या जी एच रायसोनी स्मृती तेरा वर्षाखालील मुला-मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. याामध्य यामध्ये 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान कोल्हापूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य तेरा वर्षाखालील मुला मुलींच्या निवड आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा मुले – 1) विवान सोनी इचलकरंजी 2) प्रेम गंगाराम निचल सेनापती कापशी मुली – 1) सिद्धी बुबणे नांदणी 2) सिद्धी कर्वे जयसिंगपूर यांचा समावेश असलेला संघ निवडण्यात आला.

चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धा जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन व कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन ने पुरस्कृत केल्या तर युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्व्हिसेस चे कॅप्टन उत्तम पाटील यांनी स्पर्धेसाठी हॉल उपलब्ध करून देऊन सहकार्य केले. या स्पर्धेत मुलांच्या गटात अग्रमानांकित इचलकरंजीच्या विवान सोनी सात पैकी साडेसहा गुण करून अजिंक्य ठरला. दहावा मानांकित सेनापती कापशीच्या प्रेम निचल ने सहा गुण व सरस टायब्रेक गुण (29.5) घेत उपविजेतेपदावर मुसंडी मारली तर द्वितीय मानांकित जांभळीच्या अभय भोसले ला सहा गुणांसह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. सातवा मानांकित कोल्हापूरच्या अर्णव पोर्लेकरने साडेपाच गुणासह चौथे स्थान ग्रहण केले.

मुलींच्या गटात चौथी मानांकित नांदणीची सिद्धी बुबणे सहापैकी साडेपाच गुण मिळवून सरस टायब्रेक गुणामुळे (22.5) अजिंक्य ठरली तर द्वितीय मानांकित जयसिंगपूरच्या सिद्धी कर्वे ला साडेपाच गुणासह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय मानांकित इचलकरंजीची नंदिनी सारडाने पाच गुणासह तृतीय स्थान तर अग्रमानांकित कोल्हापूरच्या सृष्टी जोशीरावला चौथे स्थान मिळाले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (NIT) वरिष्ठ प्राध्यापिका रश्मी पांडे, फिडे इन्स्ट्रक्टर मनीष मारुलकर, उत्कर्ष लोमटे, धीरज वैद्य, आरती मोदी अनिश गांधी, उमेश पाटील,इंद्रजीत कर्वे व अर्पिता दिवाण याच्या हस्ते झाला.

उत्तेजनार्थ बक्षिसे* अकरा वर्षाखालील उत्कृष्ट मुले 1) अन्वय भिवरे कोल्हापूर 2) वेदांत बांगड इचलकरंजी 3) आदित्य ठाकूर अतिग्रे मुली 1) हर्षदा सूर्यवंशी पाटील इचलकरंजी 2) गार्गी गुरव इचलकरंजी 3) शरयू शिंदे कोल्हापूर *

नऊ वर्षाखालील उत्कृष्ट* मुले 1) अर्णव वरुटे इचलकरंजी 2) श्रीतेज वाली कोल्हापूर 3) नीलमाधव पिलाई कोल्हापूर मुली 1) अवनी सूर्यवंशी इचलकरंजी 2) मैत्रैय दामूगडे कोल्हापूर 3) नारायणी घोरपडे कोल्हापूर

*सात वर्षाखालील उत्कृष्ट* मुले 1) अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर 2) हर्ष कांबळे कोल्हापूर 3) सौमित्र जोशी कोल्हापूर मुली 1) नक्षत्रा कांबळे कोल्हापूर 2) इनया मुजावर 3) जिजा व्यापारी

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande