नऊवारी साडीमध्ये ऍक्शन सीन शूट करणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं - शिवानी सोनार
मुंबई, 18 ऑगस्ट (हिं.स.)। ''तारिणी'' मालिकेमधून अभिनेत्री शिवानी सोनार एक वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तारिणी बेलसरे ही मुंबईत राहणारी अंडरकव्हर कॉप आहे जी आपल्या आईच सत्य आणि खऱ्या गुन्हेगाराला जगापुढे आणायचं म्हणून पोलिसात भरती होते. तारिणी बद
तारिणी


मुंबई, 18 ऑगस्ट (हिं.स.)।

'तारिणी' मालिकेमधून अभिनेत्री शिवानी सोनार एक वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तारिणी बेलसरे ही मुंबईत राहणारी अंडरकव्हर कॉप आहे जी आपल्या आईच सत्य आणि खऱ्या गुन्हेगाराला जगापुढे आणायचं म्हणून पोलिसात भरती होते. तारिणी बद्दलच्या काही गोष्टी शिवानीने शेअर केल्या.

सर्वात आधी तर प्रेक्षकांचे आभार कि ते तारिणीला इतकं प्रेम देत आहेत. तारिणीच्या प्रोमो शूटचा पहिल्या दिवसापासून आम्ही ऍक्शन सीन शूट करत आहोत. मला लक्षात आहे पाहिलं प्रोमो शूट जिथे मी नऊवारी साडी मध्ये ऍक्शन सीन शूट केला खूप आव्हानात्मक होत ते शूट करण. आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि तो प्रोमो पूर्ण केला. पण प्रोमो शूटच्या त्या रात्री मी ऍक्शन शॉट देताना धडपडले. तो सीन म्हणजे जिथे मला गुंडाला लाथ मारायची असते आणि धावायच असते, तर धावताना माझा बूट अडकतो आणि मी पडते. माझ्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. अजूनही तो खांदा रिकव्हर होत आहे. मी माझ्या मनाची तयारी केली आहे कारण मालिकेच नावच तारिणी आहे तेव्हा ऍक्शन सीन सारखे होणारच, आणि किती ही काळजी आणि सतर्कता पाळली तरीही ऍक्शन म्हंटल कि लागणपडणं होतच. माझी या भूमिकेसाठी निवड अशी झाली, मला प्रोडक्शन हाऊस मधून कॉल आला होता झी मराठी एक मालिका करत आहे तुला ऑडिशन द्यायला आवडेल का आणि मी पहिले एकटीने ऑडिशन दिली मग मालिकेच्या हिरोच्या भूमिकेसाठी ऑडिशन होत नंतर त्यांच्या सोबत ही लुकटेस्ट दिली आणि तारिणी, केदारची जोडी फायनल झाली. तयारी बद्दल सांगायचे झाले तर सर्वात आधी अश्या भूमिका खूप कमी लिहल्या जातात खास करून महिला पात्रांसाठी आणि ती साकारायची मला संधी मिळाली याचा खूप आनंद आहे. जेव्हा मला कॉल आला तेव्हा मी घरीच होते आणि मी सर्वांसोबत ही बातमी शेयर केली, सर्व खुश झाले. माझी झी मराठी बरोबर ही पहिली मालिका असणार आहे, या आधी मी 'उंच माझा झोका' अवॉर्ड शोच सूत्रसंचालन केले होते. तेव्हा पासून मॅनिफेस्ट केलेली गोष्ट आहे जी आता पूर्ण झाली आहे. मला टीम ही तितकीच छान मिळाली आहे. खरं सांगायचे झालं तर माझ्यासाठी हा खूपच अनपेक्षित प्रतिसाद होता जेव्हा पहिला प्रोमो आला, कारण पहिल्यांदा असे झाले आहे कि प्रोमो पाहून एकही व्यक्तींनी मला वाईट कमेंट दिली नाही. जितक्या लोकांपर्यंत प्रोमो पोहचला आहे सर्वांकडूनच छान प्रतिसाद मिळाला आहे. माझ्या घरचे ही म्हणाले काय धटिंग ऍक्शन केली आहेस तू.

तारिणी एक साधी मुलगी आहे जी आपल्या घरच्यांवर खूप प्रेम करते, त्यांना त्रास होईल असे कधी वागत नाही पण जेव्हा गुन्हेगारांना धडा शिकवायचा असतो तेव्हा तिचं रौद्र रूप बाहेर येत. हे पाहायला प्रेक्षकांना खूप आवडणार आहे. तारिणीच्या दोन वेगळ्या छवी नसून ती एकच आहे. पण आपल्या घरच्यांच्या प्रेमा आणि काळजी पोटी आपलं अंडरकव्हर कॉपच रूप ती त्यांच्या पासून लपवत आहे. तारिणीच्या मनगटात इतकी ताकत आहे कि ती ज्या हातानी पोळी बनवू शकते त्याच हातानी ती गुंडाना ही मारू शकते. तारिणी अशी आहे कारण तिची आई पोलीस खात्यात एका चांगल्या पदावर कार्यरत होती. पण असे काही होत कि तिची आई आता ह्यात जगात नाही आणि तारिणी खूप लहान वयात आपल्या आईला गमावते. तारिणीच्या आई बरोबर जे होत त्यामुळे ती गेल्यावर तारिणीपासून सर्व नाती दुरावतात, पण तिच्या आज्जी सोबत तिचं खास नातं आहे. भले ही सर्व घरचे सोबत आहेत पण मनानी त्यांच्यात दुरावा आहे. तारिणीचा असा सेट आहे जिथे माझ्यासाठी सर्वच नवीन आहेत आणि मी त्यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करत आहे निर्माती शर्मिष्ठा ताई आणि तेजस सरांसोबत असो, दिग्दर्शक भीमराव मुढे सर आणि संपूर्ण कलाकार टीम आणि मुळात झी मराठी सोबत मी पहिल्यांदा काम करत आहे. मी खूप उत्सुक आहे या प्रवासासाठी. मी अभिज्ञासोबत मके-अप रूम शेयर करत आहे त्यामुळे तिच्यासोबत थोडी जास्त मैत्री झाली आहे. पण इतक्या उत्तम कलाकारांसोबत काम करताना मला खूप काही शिकायला ही मिळणार आहे. प्रेक्षकांना हेच सांगेन कि मला वाटत कि प्रत्येक स्त्री तारिणी आहे, कारण ती आपल्या माणसांवर प्रचंड प्रेम करते आणि जेव्हा तिच्या माणसांवर कोणती अडचण येते तेव्हा ती दुर्गेच रूप ही धारण करते आणि त्यांचं रक्षण करते, वाईट प्रवृत्ती पासून रक्षण करण्यासाठी खंबीर उभी राहते.”

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande