‘बागी 4’ चित्रपटातील पहिलं गाणं ‘गुजारा’ प्रदर्शित
मुंबई, 18 ऑगस्ट (हिं.स.)। चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता प्रतिक्षा संपवत ‘बागी 4’चं पहिलं गाणं ‘गुजारा’ प्रदर्शित केलं आहे. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘बागी 4’ मुळे सतत चर्चेत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड
film Baaghi 4 song Gujara released


मुंबई, 18 ऑगस्ट (हिं.स.)। चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता प्रतिक्षा संपवत ‘बागी 4’चं पहिलं गाणं ‘गुजारा’ प्रदर्शित केलं आहे. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘बागी 4’ मुळे सतत चर्चेत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साह दिसून येत आहे, कारण ही ‘बागी’ फ्रँचायझीतील आतापर्यंतची सर्वाधिक प्रतिक्षित फिल्म मानली जात आहे. विशेष म्हणजे या वेळी टायगरसोबत स्क्रीनवर मिस युनिव्हर्स 2021 हरनाज संधू दिसणार आहे. पहिल्यांदाच दोघं एकत्र पडद्यावर रोमॅन्स करताना दिसणार आहेत.

‘गुजारा’ या गाण्यात टायगर आणि हरनाजची मोहक केमिस्ट्री उत्तम प्रकारे दाखवण्यात आली आहे. रोमँटिक अंदाज आणि सुंदर लोकेशन्सवर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं सोशल मीडियावर आल्यानंतर काही क्षणांतच ट्रेंड होऊ लागलं आहे. याला आपल्या मधुर आवाजात जोश बरार आणि परंपरा टंडन यांनी सजवलं आहे, तर गीत सुप्रसिद्ध गीतकार कुमार यांनी लिहिलं आहे.

‘बागी 4’चं दिग्दर्शन ए. हर्ष यांनी केलं आहे, जे याआधी कन्नड चित्रपट ‘बजरंगी’ आणि ‘वेधा’मुळे ओळखले जातात. तर चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला आहेत, जे ‘बागी’ सीरिजचं निर्मितीकार्य बराच काळ करत आहेत. या वेळी मेकर्सनी स्टारकास्टला अधिक बळकटी देत सोनम बाजवा आणि संजय दत्त यांनाही चित्रपटात घेतलं आहे. विशेष म्हणजे संजय दत्त या चित्रपटात एक अत्यंत ख़तरनाक खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

ऍक्शन आणि रोमॅन्सने भरलेला ‘बागी 4’ प्रेक्षकांना व्हिज्युअल ट्रीट ठरणार असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, तो बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धमाका करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande