मुंबई, 3 ऑगस्ट (हिं.स.)।बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने नुकतेच सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अलीकडेच ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली.ज्यात राणी मुखर्जीला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या 'मिसेज चटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यानंतर आता तिने सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेऊन येथील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पारंपरिक ड्रेसमध्ये दिसली. तिचा हा साधा आणि पारंपरिक लूक चाहत्यांना प्रचंड भावला असून, तिच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीने देबिका चॅटर्जी ही भूमिका साकारली होती. ज्यात आपल्या मुलांसाठी आईच्या संघर्षाची कथा मांडली होती.राणी मुखर्जीच्या आगामी 'मर्दानी ३' मध्ये झळकणार आहे. पुढील वर्षी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode