मुंबई, 3 ऑगस्ट (हिं.स.)।अश्विन कुमार दिग्दर्शित ‘महावतार नरसिंह’ चित्रपट जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन प्रेक्षकांमध्ये तुफान गाजत आहे. २५ जुलै रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्यापासूनच दमदार कमाई सुरू केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ६० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
सैयारा, धड़क २ आणि सन ऑफ सरदार २ यांसारख्या चित्रपटांचा ‘महावतार नरसिंह’च्या कमाईवर कोणताही परिणाम झालेला नाही. रिपोर्ट्सनुसार, नवव्या दिवशी या चित्रपटाने १५ कोटींचा कलेक्शन केला आहे. ‘महावतार नरसिंह’ ही आतापर्यंतची सर्वात जास्त कमाई करणारी ऍनिमेशन फिल्म ठरली आहे. यापूर्वी ‘हनुमान’ ने ११ कोटी, ‘रोडसाइड रोमिओ’ ने ६ कोटी, आणि ‘छोटा भीम’ ने ४.५ कोटी रुपयांची कमाई केली होती.
‘महावतार नरसिंह’ चित्रपटाने पहिल्या आठवड्यात एकूण ४४.७५ कोटी कमावले.तर हिंदी डब व्हर्जनने पहिल्या आठवड्यात २९ कोटी रुपये कमावले.ज्या पद्धतीने ही फिल्म कमाई करत आहे, त्यावरून असे वाटते की दुसऱ्या रविवारीही चित्रपट तुफान कमाई करेल आणि सर्वांनाच आश्चर्यचकित करेल. अंदाजानुसार, ‘महावतार नरसिंह’ १२५ कोटींपेक्षा जास्त कमाई करू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode