कीव, 29 ऑगस्ट (हिं.स.)। रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही. रशियाने जमिनीनंतर आता समुद्राला लक्ष्य केलं आहे. गुरुवारी (२८ ऑगस्ट) रशियाने युक्रेनच्या नौदलाच्या एका जहाजावर ड्रोन हल्ला केला. हे जहाज एक टोही (रेकी) जहाज होतं आणि ते बुडाल्याची माहिती समोर आली आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की हे जहाज “लगुना-श्रेणीचं” मध्यम आकाराचं जहाज होतं, ज्यामध्ये रेडिओ, इलेक्ट्रॉनिक, रडार आणि ऑप्टिकल उपकरणं होती. हे जहाज विशेषतः टोही मोहिमांसाठी डिझाइन केलं गेलं होतं. हा हल्ला डेन्यूब नदीच्या डेल्टा भागात झाला, ज्याचा काही भाग युक्रेनच्या ओडेसा प्रदेशात येतो. रशियन मीडिया या घटनेची पुष्टी केली आहे.
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी देखील या हल्ल्याची पुष्टी केली आहे. या हल्ल्यात एका खलाशाचा मृत्यू झाला असून अनेक खलाशी जखमी झाले आहेत. युक्रेनी प्रवक्त्यांनुसार, हल्ल्यानंतरच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बहुतांश खलाशी सुरक्षित आहेत, पण काही लोक अजूनही बेपत्ता आहेत.
‘सिम्फेरोपोल’ हे जहाज २०१९ साली लॉन्च करण्यात आलं होतं आणि २०२१ मध्ये युक्रेनच्या नौदलात सामील करण्यात आलं. याची खासियत म्हणजे कीवकडून २०१४ नंतर लॉन्च झालेलं हे सर्वात मोठं जहाज आहे. हे मुख्यतः टोही आणि देखरेखीच्या मोहिमांसाठी वापरलं जातं. हे अत्याधुनिक सेन्सर आणि रडार प्रणालींनी सुसज्ज आहे. दुसरीकडे, रशियन टेलीग्राम चॅनलने या घटनेला युक्रेनच्या नौदल क्षमतेवर एक मोठा धक्का असल्याचं म्हटलं आहे. रशियन मीडियाच्या माहितीनुसार, ही पहिली वेळ होती जेव्हा एखाद्या नौदलाच्या जहाजावर यशस्वीपणे समुद्री ड्रोनद्वारे हल्ला रकरण्यात आला. ही घटना दाखवते की आधुनिक युद्धामध्ये मानवरहित नौदल प्रणाली किती प्रभावी ठरू शकतात.
अलीकडच्या महिन्यांमध्ये रशियाने नौदल ड्रोन आणि इतर मानवरहित प्रणालींच्या उत्पादनात मोठी गती आणली आहे. ड्रोन आता या युद्धात निर्णायक भूमिका बजावत आहेत. रशियाने असा दावा केला आहे की त्यांनी कीवमधील एका प्रमुख ड्रोन कारखान्यावर क्षेपणास्त्र हल्ला केला. ही जागा तुर्कीच्या ‘बायरकटार’ ड्रोनच्या उत्पादनासाठी सज्ज केली जात होती. यावरून स्पष्ट होतं की युद्धात आता हवाई आणि नौदल ड्रोनचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode