टोकियो, ३० ऑगस्ट (हिं.स.)भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमध्ये ताशी ३२० किमी वेगाने धावणाऱ्या शिंकानसेन बुलेट ट्रेनमध्ये प्रवास केला. या प्रवासात जपानचे पंतप्रधान इशिबा देखील त्यांच्यासोबत होते. भारतीय पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर या प्रवासाचे काही फोटो अपलोड केले आहेत.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या जपान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एक्स वर लिहिले की, सेंदाईला पोहोचलो. पंतप्रधान इशिबा यांच्यासोबत शिंकानसेनने या शहरात प्रवास केला. पंतप्रधान मोदी भारतातही अशीच ट्रेन आणू इच्छितात हे उल्लेखनीय आहे. शिंकानसेन बुलेट ट्रेन त्यांच्या अजेंडाचा एक प्रमुख भाग आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे