पातूर मध्ये भाजपचा प्रवेश सोहळा संपन्न
अकोला, 3 ऑगस्ट (हिं.स.)। सामाजिक समरसता सोबत सबका साथ सबका विकास सबका विश्वास सोबत राष्ट्रीय संस्कृती जतनचं काम परंपरेला विस्तार करण्याचे काम विकासाचा सूत्र घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपला महाराष्ट्र आपला परिवार ही भावना जपणारे मुख्यमंत्री देवें
P


अकोला, 3 ऑगस्ट (हिं.स.)। सामाजिक समरसता सोबत सबका साथ सबका विकास सबका विश्वास सोबत राष्ट्रीय संस्कृती जतनचं काम परंपरेला विस्तार करण्याचे काम विकासाचा सूत्र घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपला महाराष्ट्र आपला परिवार ही भावना जपणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात देश आणि महाराष्ट्र प्रगतीवर जात असून सर्व जाती धर्माचे सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहे आणि माळी समाजाची ज्येष्ठ सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते शैलेंद्र प्रकाश बोचरे यांनी आपल्या सहकारी पवनमहैसने ,ओम पोफळे,सुवेग बोबळे,हनुमान आंबेकर, अमोल आंबेकर, बंडू सोळकें, निखिल पोफळे, राहुल तायडे सचिन ढोणे नागोराव ,ताले यांनी आपल्या 50 सहकार्यास सोबत भाजपात प्रवेश केला ही भाजपाच्या विस्तारासोबत विकासाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

पातुर भागातील शैलेश प्रकाश बोचरे यांनी आपल्या सहकार्यासह प्रवेश भाजपा कार्यालयात केला त्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष संतोष शिवरकर हे होते तर खासदार अनुप धोत्रे,अंबादास उमाळे विजय अग्रवाल जयंत मसने माधव मानकर अंबादास उमाळे गणेश गाडगे रमण जैन चंद्रकांत अंधारे भिकाजी धोत्रे हे प्रामुख्याने उपस्थित होतेजिल्ह्याचा विकास करणे आणि सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून न्याय मिळवून देणे हेच कर्तव्य खासदार धोत्रे

सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष नेतृत्व कटिबद्ध असून पातुर शेगाव या रस्त्यासाठी 300 कोटी रुपये राज्याचे दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी मंजूर करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच वेगवेगळ्या सुविधा शेतकऱ्यांसोबत ग्रामस्थांसाठी शेतकऱ्यांसाठी रस्ते शेत रस्ते करण्याचे निर्णय या सरकारने घेतला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी व सर्वसामान्य हितासाठी ओबीसी समाजाला सोबत घेऊन राष्ट्रहिता पक्ष भाजपा असून बोचरे व त्यांच्या सहकार्याच्या यांच्या प्रवेशाने पातुर भागात भाजपाला बळ मिळेल असा विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला.

. बोचरे यांनी आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश कुंडकर आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, आमदार वसंत खंडेलवाल संतोष शिवरकर, जयंत मसने किशोर पाटील तेजराव थोरात विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा प्रवेश केला असून पक्ष विस्तारासाठी आपण कटिबद्ध राहून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि पक्ष देईल ती जबाबदारी ती पूर्ण करू असे अभिवचन बोचरे यांनी यावेळी दिले कार्यक्रमाचे संचालन भिकाजी धोत्रे तर प्रास्ताविक चंद्रकांत अंधारे आभार प्रदर्शन रमण जैन यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande