अकोला : 'वंचितचे' गाव तिथे शाखा अभियान
अकोला, 3 ऑगस्ट (हिं.स.) : तेल्हारा तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडी ची प्रत्येक जि. प.सर्कल नुसार बांधणी झालेली असून गाव तिथे शाखा अभियानाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. या अभियान अंतर्गत २ ऑगस्ट २०२५ रोजी विविध ५ शाखेंचे ज्यामध्ये घोडेगाव, पा
P


अकोला, 3 ऑगस्ट (हिं.स.) : तेल्हारा तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडी ची प्रत्येक जि. प.सर्कल नुसार बांधणी झालेली असून गाव तिथे शाखा अभियानाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. या अभियान अंतर्गत २ ऑगस्ट २०२५ रोजी विविध ५ शाखेंचे ज्यामध्ये घोडेगाव, पाथर्डी, टाकळी, भांबेरी, खेल देशपांडे येथे नाम फलकचे अनावरण वंचित बहुजन युवा आघाडी चे प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले. विशेष म्हणजे युवा आघाडीच्या या अभियान मध्ये प्रत्येक समूहातील युवकांचा प्रचंड प्रतिसाद पहायला मिळाला. शाखा नामफलक अनावरण पूर्वी शासकीय विश्राम भवन तेल्हारा येथे युवा संवाद बैठक पार पडली. येथे राजेंद्र भाऊ पातोडे यांनी देशात ज्याप्रमाणे संविधानाशी खेळून सर्वसामान्यांचे हक्क हिरवण्याचे प्रयत्न होत आहेत त्याला युवकच उत्तर देऊ शकतात करीता युवकांनी समोर येण्याची गरज आहे. तर आजपर्यंत जेवढ्या क्रांत्या झाल्या त्या युवकांनीच केल्या आहेत असे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांनी सांगितले. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पाटील घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा उपाध्यक्ष नितीन वानखडे,सचिन शिराळे, नकुल काटे,जय तायडे, तालुका अध्यक्ष झिया शाह महासचिव राजेश दारोकार, संघटक अनंत इंगळे, पंचायत समिती माजी सभापती आम्रपाली गवई, माजी जि प सदस्य सैफुल्ला खान,प्रदीप तेलगोटे, तालुका कोषध्यक्ष अन्वर खान, भांबेरी सर्कल अध्यक्ष जाफर खान, महासचिव शुद्धोधन बोदडे, खेलदेशपांडे शाखा अध्यक्ष राजेश गवारगुर, महासचिव नौशाद खान, पाथर्डी सर्कल अध्यक्ष विशाल बाहकार, महासचिव विनोद दामोदर, टाकळी ग्राम शाखा अध्यक्ष आशिष गवई,शाखा महासचिव प्रमोद पाथ्रीकर, संघटक सिद्धार्थ वानखडे, घोडेगाव ग्रामशाखा अध्यक्ष आनंद दामोदर,शाखा कोशाध्यक्ष सुमित इंगळे,सचिव रोहित दांडगे, दत्तात्रय भडाखे,सतीश तायडे,प्रशांत सरदार,नईम देशमुख,मिलिंद भिसे,अमर वानखडे,बजरंग खेट्टे,विखल तायडे आदी तालुक्यातून आलेले बहुसख्येने आलेले पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande