अकोला, 3 ऑगस्ट (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त युवकांमध्ये एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृतीसाठी जिल्हा एड्स प्रतिबंधक पथक व क्रीडा कार्यालयातर्फे रेड रन’ स्पर्धा संपन्न झाली.वसंत देसाई क्रीडांगण येथून सुरू होऊन दुर्गा चौक, सिव्हिल लाईन चौक, अशोक वाटिका चौक ते वसंत देसाई स्टेडियमपर्यंत संपन्न झालेल्या‘रेड रन’ स्पर्धेला जिल्हा कार्यक्रम अधिकारी दर्शन जनाईकर, डॉ आशिष लाहोळे,सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती शिरसाठ,जिल्हा पर्यवेक्षक ज्ञानेश्वर भेंडेकर यांनी हिरवी झेंडी दाखवली.. ५ किलोमीटर रेड रन स्पर्धेमध्ये १७ ते २५ वयोगटातील युवक युवतींनी सहभाग नोंदवला होता.युवक गटांमध्ये ओम वाडेकर,करण चव्हाण, कृष्णकांत राखोंडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक पटकाविला.तर युवती गटामध्ये आचल दहाट्रे, गायत्री धोत्रे, साक्षी वानखडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक पटकविला
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे