भुवनेश्वर, 3 ऑगस्ट (हिं.स.) :
संशयित
नक्षलवाद्यांनी ओडिशा-झारखंड सीमेवर एक रेल्वे ट्रॅक उडवून दिला. ही घटना
माओवाद्यांनी साजरी केलेल्या 'शहीद
सप्ताह'च्या शेवटच्या दिवशी घडली. झारखंडमधील
करमपाडा आणि ओडिशातील रेंजेडा स्टेशन दरम्यान सारंडा वनक्षेत्रात ही घटना घडली. ज्यामुळे या मार्गावरील गाड्यांची वाहतूक
थांबली.प्राथमिक माहितीनुसारबिमलगड रेल्वे विभागाअंतर्गत पहाटेच्या सुमारास
स्फोट झाला. ज्यामुळे रेल्वे ट्रॅकचे मोठे नुकसान
झाले. पणघटनेच्या वेळी ट्रॅकवर कोणतीही ट्रेन नसल्यामुळे
मोठी दुर्घटना टळली.
घटनेनंतर
रेल्वे वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आहे. दुसरीकडेओडिशा पोलीस, झारखंड पोलिस, सीआरपीएफ आणि झारखंड जग्वार यांच्या संयुक्त पथकांनी सारंडा
वनक्षेत्रात व्यापक शोध आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. रेल्वे ट्रॅकवर इतर
संभाव्य स्फोटके तपासण्यासाठी बॉम्ब निकामी पथके देखील तैनात करण्यात आली आहेत.
झारखंडमधील करमपाडा
आणि ओडिशामधील रंगेडा ही दोन्ही स्थानके सीमावर्ती भागात आहेत. आणि ती माओवाद्यांसाठी संवेदनशील मानली जातात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra