नवी दिल्ली, 5 ऑगस्ट (हिं.स.)।जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी (५ ऑगस्ट) ७९ व्या वर्षी निधन झाले. सत्यपाल मलिक यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) जारी केलेल्या शोकसंदेशात पंतप्रधान म्हणाले की, सत्यपाल मलिकांच्या निधनामुळे अतिशय दुःखी असून त्यांचे कुटुंबिय आणि समर्थकांप्रती संवेदना व्यक्त करतो. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे आज, मंगळवारी निधन झाले. त्यांना ११ मे रोजी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि मंगळवारी दुपारी १ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सत्यपाल मलिक यांनी त्या काळात मोदी सरकारने लागू केलेल्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात उघडपणे शेतकऱ्यांचा पाठिंबा दर्शवला होता. देशभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात बोलणारे मोजके मोठे नेते म्हणून त्यांची ओळख होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode