उत्तर प्रदेश: गोंडा येथे अनियंत्रित कार कालव्यात कोसळली, ११ जणांचा मृत्यू
लखनऊ, 3 ऑगस्ट (हिं.स.) : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण पृथ्वीनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात असताना इटियाथोक पोलीस स्टेशन परिसरात अचानक कार कालव्यात पडली. कारमध
बोलेरो गाडी कालव्यात पडली


लखनऊ, 3 ऑगस्ट (हिं.स.) :

उत्तर

प्रदेशातील गोंडा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. हे

सर्वजण पृथ्वीनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात असताना इटियाथोक पोलीस स्टेशन

परिसरात अचानक कार कालव्यात पडली. कारमध्ये १५ जण होते. सध्या घटनास्थळी मदत आणि

बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री योगी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे आणि

अधिकाऱ्यांना लवकरच मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत.

स्थानिक

नागरिकांनी सांगितले की, कारमध्ये १५ जण होते. जे गोंडाच्या प्रसिद्ध पृथ्वीनाथ

मंदिरात जलाभिषेक आणि दर्शनासाठी जात होते. कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि

रस्त्याच्या कडेला बांधलेल्या कालव्यात पडली. या अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू

झाला. तर

इतर चार जण जखमी झाले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात

येत आहे.

अपघाताची

माहिती मिळताच इटियाथोक पोलीस स्टेशन, एनडीआरएफ

आणि स्थानिक प्रशासनाची पथके घटनास्थळी पोहोचली. बचावकार्याला गती देण्यासाठी

क्रेन आणि इतर उपकरणांचा वापर करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी

पाठवले आहेत आणि जखमींवर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

प्राथमिक तपासातअतिवेग आणि रस्त्याची वाईट अवस्था हे

अपघाताचे कारण मानले जात आहे.

पृथ्वीनाथ

मंदिर गोंडा जिल्ह्यातील कर्नैलगंज भागात आहे आणि ते आशियातील सर्वात मोठ्या

शिवलिंगांपैकी एकासाठी प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात येथे मोठ्या संख्येने भाविक

दर्शनासाठी येतात. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यांनी सांगितले की, जखमींवर शक्य तितके सर्व उपचार केले जात आहे,

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande