अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा!
अकोला, 31 ऑगस्ट (हिं.स.)। अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलं आहे. रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक १० मध्ये गेल्या एका महिन्यापासून घाणीचे साम्राज्य असून, रुग्ण व बालकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. जिल्हा स्त्री रुग
प


अकोला, 31 ऑगस्ट (हिं.स.)।

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलं आहे. रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक १० मध्ये गेल्या एका महिन्यापासून घाणीचे साम्राज्य असून, रुग्ण व बालकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे.

जिल्हा स्त्री रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचाराकरिता दाखल होतात. अकोला जिल्ह्यासह वाशिम, मालेगाव, खामगाव, बुलढाणा, वाडेगाव, पातूर, मुर्तिजापूर, बार्शीटाकळी अशा विविध भागातून रुग्ण येथे येतात. मात्र इतक्या मोठ्या रुग्णालयात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

रुग्णालयातील साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट खासगी डीएम कंपनीला दिला असला तरी त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून सर्रास निष्काळजीपणा केला जात असल्याचं दिसून येत आहे. गेट परिसरात व वार्डांमध्ये घाणीचे साम्राज्य असून, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छतेचा कोणताही फायदा मिळत नाही.

यापूर्वीही रुग्णालयातील घाणीबाबत स्थानिक माध्यमांतून वारंवार प्रसार झाला. मात्र डीएम कंपनीचे ठेकेदार, सुपरवायझर तसेच रुग्णालयाचे शासकीय सुपरवायझर यांनी अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. उलट विचारणा केल्यास, “तुम्हाला जे करायचं असेल ते करा” असा बेफिकीर प्रतिसाद दिला जातो.

सरकारी रुग्णालयातील या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या आरोग्य सेवेत होत असलेला हा गैरकारभार नेमका कुणाच्या मर्जीने सुरू आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जिल्हा स्त्री रुग्णालय अकोल्यातील घाणीचं साम्राज्य आणि डीएम कंपनीचा बोगस कारभार तातडीने थांबवून रुग्णांना दिलासा मिळावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande