फडणवीसांना टार्गेट करण्याकरीताच जरांगेंचे आंदोलन - गृहराज्यमंत्री पंकज भोयर
नागपूर, 31 ऑगस्ट (हिं.स.)। कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याकरीता आंदोलन करण्यात येत असल्याची शंका राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी येथे व्यक्त केली.
Minister of State for Home Pankaj Bhoyar


नागपूर, 31 ऑगस्ट (हिं.स.)। कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याकरीता आंदोलन करण्यात येत असल्याची शंका राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी येथे व्यक्त केली. ते विदर्भातील भाजपाच्या ओबीसी आमदारांच्या पत्रपरिषदेत ते बोलत होते.

मराठ्यांना यावेळी आमदार सर्वश्री प्रवीण दटके, समीर मेघे, कृष्णा खोपडे, प्रताप अडसड, माजी खासदार सतीश मेंढे, खासदार रामदास तडस आदी उपस्थित होते.

ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे ही मनोज जरांगेंची भूमिका आडमुठी आहे. त्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. मराठ्यांना यापूर्वी १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. सरकार चर्चेच्या माध्यमातून प्रश्न साेडवण्यास तयार आहे, असे भोयर म्हणाले. या पूर्वीही फडणवीस सत्तेवर असतानाच मराठ्यांची आंदोलने झाली. हे लक्षात घेता त्यांना टार्गेट करण्याकरीता आंदोलन केले जाते, अशी शंका भोयर यांनी व्यक्त केली. जरांगे यांना कोणीतरी रसद पुरवित असल्याचे आरोप होत आहे. मुख्यमंत्र्यांनीही रसद कोण पुरवित आहे हे माहिती असल्याचे प्रतिपादन केले. मग नेमके कोण रसद पुरवित आहे, असा प्रश्न विचारला असता रसद पुरविणाऱ्यांची नावे योग्य वेळी जाहीर करू, असे म्हणत भोयर यांनी प्रश्नाला बगल दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande