परभणी : वस्सा येथील विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू
परभणी, 31 ऑगस्ट (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील वस्सा येथील विहिरीत बुडून २१ वर्षीय अभिषेक राऊत याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. त्यामूळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अभिषेक गजानन राऊत (वय २१) असे मृतकाचे नाव असून ग्रा
परभणी : वस्सा येथील विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू


परभणी, 31 ऑगस्ट (हिं.स.)।

जिंतूर तालुक्यातील वस्सा येथील विहिरीत बुडून २१ वर्षीय अभिषेक राऊत याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. त्यामूळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

अभिषेक गजानन राऊत

(वय २१) असे मृतकाचे नाव असून ग्रामस्थांच्या प्रयत्नातून पाच तासानंतर त्याचा मृतदेह आढळून आला.

तालुक्यातील बोरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वस्सा येथील अभिषेक गजानन राऊत हा पोहण्यासाठी गावशिवारातील विहिरीत उतरला. पण काही क्षणांतच काळाच्या दाढेत गेला. तो परत न आल्याने ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला.

यात गावातील नारायण ताटे, अजय सातव, पिंटू पाटील, राम मगर, दासू राऊत, बंडू राऊत, काशिनाथ राऊत, मुंजाजी शिंदे, गणेश शिंदे अशा अनेक तरुणांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून अथक प्रयत्न केले. दरम्यान, जिंतूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलानेही पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

विहिरीतील पाणी विद्युत पंपाद्वारे उपसून शोधण्याचे प्रयत्न करताना तब्बल पाच तासांनी आढळून आलेला अभिषेकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घरातील एक मुलगा गमावल्याने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. बोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande