रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या देखाव्यातून वृक्षारोपणाचा संदेश
रत्नागिरी, 31 ऑगस्ट, (हिं. स.) : शेळवीवाडी (हर्चे, ता. लांजा) येथील तोडणकर कुटुंबीयांनी घरगुती गणपती सजावटीत कोकणातील पालखीतून गणरायाचे आगमन दाखवले आहे. तसेच एक पेड माँ के नाम हा गणेशजींचा संदेश चित्र देखावा दाखवला आहे. तोडणकर परिवारातील हर्षद तो
तोडणकर कुटुंबीयांचा पर्यावरण संदेशाचा देखावा


रत्नागिरी, 31 ऑगस्ट, (हिं. स.) :

शेळवीवाडी (हर्चे, ता. लांजा) येथील तोडणकर कुटुंबीयांनी घरगुती गणपती सजावटीत कोकणातील पालखीतून गणरायाचे आगमन दाखवले आहे. तसेच एक पेड माँ के नाम हा गणेशजींचा संदेश चित्र देखावा दाखवला आहे.

तोडणकर परिवारातील हर्षद तोडणकर दरवर्षी गणेशोत्सवात नावीन्यपूर्ण देखावे सादर करतात. यावर्षीही त्यांनी वेगळा देखावा सादर केला आहे. यात माणसा माणसा, एक तरी झाड लाव, असा पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषा गौरव, संवर्धन संदेश देणारा माहिती देखावा तयार करण्यात आला आहे.

या देखाव्यासाठी त्यांनी पर्यावरणपूरक साहित्य म्हणजेच पुठ्ठा, कागद यांचा वापर केला आहे. या तिन्हीही संकल्पनांतून समाज जागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या देखाव्याविषयी परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande