'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत येणार रोमॅन्टिक वळण
मुंबई , 4 ऑगस्ट (हिं.स.)।अभिनेता विशाल निकम आणि पूजा बिरारीची मुख्य भूमिका असलेली ''येड लागलं प्रेमाचं'' मालिका गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. सध्या या मालिकेत आता एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. रायाला त्याची हरवलेली आई साप
'येड लागलं प्रेमाचं' मालिका


मुंबई , 4 ऑगस्ट (हिं.स.)।अभिनेता विशाल निकम आणि पूजा बिरारीची मुख्य भूमिका असलेली 'येड लागलं प्रेमाचं' मालिका गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. सध्या या मालिकेत आता एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. रायाला त्याची हरवलेली आई सापडली आहे. सध्या सोशल मीडियावर येड लागलं प्रेमाचं मालिकेचा नवा समोर आला आहे. या प्रोमोने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. लवकरच या मालिकेत एक रोमॅन्टिक वळण पाहायला मिळणार आहे.

मालिकेत गेले कित्येक दिवस राया आणि मंजिरी एकत्र येणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना वाटला होता. आता अखेर मंजिरी रायाला तिच्या मनातील भावना सांगणार असल्याचा प्रोमो सोशल मीडियावर समोर आला आहे. अनेक अडचणींवर मात करत राया-मंजिरी आता जाहीरपणे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसणार आहेत. या प्रोमोमध्ये मंजिरी रायाला रोमँटिक अंदाजात प्रपोज करणार असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील हा प्रोमो पाहून प्रेक्षक आता मालिकेचा हा आगामी एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मालिकेचे प्रेक्षक देखील राया-मंजिरी एकमेकांना आपल्या मनातील भावना केव्हा व्यक्त करणार याची वाट पाहात होते. त्यामुळे आता मालिकेचा नवा प्रोमो समोर आल्याने हे दोघेही एकमेकांसमोर व्यक्त होणार का? हे पाहण्यासाठी पाहणं औत्सुक्याचं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande