उत्तरकाशीच्या धरालीमध्ये ढगफुटी; 4 जणांचा मृत्यू तर  50 जण बेपत्ता
डेहराडून, 5 ऑगस्ट (हिं.स.) : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धरालीजवळील खीर गंगा नदीवर ढगफुटीमुळे पूर आला. या घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तर ५० जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.
उत्तरकाशी ढगफुटी


डेहराडून, 5 ऑगस्ट (हिं.स.) :

उत्तराखंडच्या

उत्तरकाशी जिल्ह्यातील धरालीजवळील खीर गंगा नदीवर ढगफुटीमुळे पूर आला. या घटनेत

आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तर ५० जण बेपत्ता

असल्याची माहिती आहे. पूरामुळे २०-२५ हॉटेल्स आणि होमस्टे वाहून गेले आहेत. मुख्यमंत्री

पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियावर सांगितले की, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि

जिल्हा प्रशासनाचे पथक मदत आणि बचाव कार्यात युद्धपातळीवर मदत करत आहेत.

उत्तरकाशीतील

धारली गावाकडे टेकडीवरून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत असतानाअनेक घरे वाहून गेल्याने भयानक दृश्ये

समोर आली आहेत. हर्षिलजवळील धारली भागात ढगफुटी झाली. या घटनेत एक गाव वाहून गेले

आणि अनेक रहिवासी बेपत्ता झाले आहेत. पाण्याची पातळी अचानक वाढल्यानंतर स्थानिक

बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद झाली आहे, त्यानंतर पोलीस, अग्निशमन विभाग, एसडीआरएफ आणि भारतीय लष्कराने तातडीने मदतकार्य

सुरू केले आहे.

उत्तरकाशीच्या

एसपी सरिता डोभाल यांनी सांगितले की, लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढून सुरक्षित

ठिकाणी हलवण्यात आले आहे. स्थानिक पोलीस, एसडीआरएफ, आयटीबीपी आणि भारतीय लष्कराच्या राजपूत रायफल्स

घटनास्थळी उपस्थित आहेत. वाटेत पुन्हा एकदा भूस्खलन झाले असल्यानेआमच्या काही टीम तिथेच अडकल्या आहेत.

भारतीय

लष्कराच्या सूर्या कमांडने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून या दुर्घटनेची माहिती

दिली. ते म्हणाले, हर्षिलजवळील खिरगड परिसरातील धराली

गावात भूस्खलन झाले आहे. यामुळे अचानक कचरा आणि पाणी वस्तीत वाहू लागले. आयबेक्स

ब्रिगेडचे जवान तातडीने तैनात करण्यात आले आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि

बचाव कार्य करण्यासाठी बाधित ठिकाणी पोहोचले. भारतीय लष्करासोबतच पोलीस, अग्निशमन विभाग, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल देखील

घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande