अवघ्या 10 दिवसांच्या बाळाला आईपासून केले वेगळे
अकोला, 7 ऑगस्ट (हिं.स.)।अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दहा दिवसाच्या बाळाला बापानेच आई पासून वेगळे केल्याने आईने आक्रोश सुरू केलाय.. दरम्यान अकोल्याच्या मेहरा बानो मोहम्मद शाकिब या बाळापुरात राहणाऱ्या महिलेचा विवाह मुर्तीजापुर येथे मोहम
अवघ्या 10 दिवसांच्या बाळाला आईपासून केले वेगळे


अकोला, 7 ऑगस्ट (हिं.स.)।अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दहा दिवसाच्या बाळाला बापानेच आई पासून वेगळे केल्याने आईने आक्रोश सुरू केलाय.. दरम्यान अकोल्याच्या मेहरा बानो मोहम्मद शाकिब या बाळापुरात राहणाऱ्या महिलेचा विवाह मुर्तीजापुर येथे मोहम्मद शाकिब मोहम्मद आशाद यांच्याशी झाला होता काही दिवस सुखाचे गेले नंतर कौटुंबिक कलह सुरू झाला दोन महिन्यापूर्वी 20 मे रोजी मेहरा बानो मोहम्मद शाकिब ही गरोदर असताना नातेवाईक तिला बाळंतपणासाठी घेण्यासाठी आले असता त्यांना सुद्धा मारहाण केली. त्याची तक्रारही मूर्तिजापूरला दिली होती. दरम्यान 25 जुलै रोजी मेहर बानो मोहम्मद शाकीर तिची प्रसूती झाली.. तिला मुलगा झाला असं वाटलं आता पती-पत्नीचा कलह मिटणार मात्र तो आणखीनच वाढला. अवघ्या दहा दिवसाच्या बाळाची प्रकृती खालावल्याने त्याला अकोल्याच्या शुक्ला हॉस्पिटलमध्ये भरती केले दरम्यान याच वेळी पती मोहम्मद शकीब मोहम्मद आशाद यांनी पत्नीशी भांडण करून दहा दिवसाच्या बाळाला शुक्ला हॉस्पिटल येथून चार ऑगस्ट रोजी घेऊन गेला.. नवजात कोवळ्या बाळाला आईच्या मायेपासून दूर केल्याने आईचा आक्रोश सुरू झाला. यावेळी बाळाच्या आईने रामदास पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली मात्र त्यांनी तक्रार ची दखल न घेतल्याने अखेर थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली मात्र मला माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करू नका मला न्याय द्या अन्यथा मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी करेल असा आक्रोश यावेळी बाळाची आई मेहरा बानो मोहम्मद शाकिब यांनी केलाय. अकोल्यात बाळाच्या आईची ठाणे ते पोलीस अधीक्षक कार्यालयात पायपीट सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande