नालासा वीर सहाय्यता योजना अंतर्गत विधी सेवा मदत कक्षाचे परभणीत उद्घाटन
परभणी, 8 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नालासा वीर सहाय्यता योजना – 2025 अंतर्गत विधी सेवा मदत कक्षाचे उद्घाटन आज, 8 ऑगस्ट रोजी करण्यात आले. कार्यक्रमाचे
नालासा वीर सहाय्यता योजना


परभणी, 8 ऑगस्ट (हिं.स.)।

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नालासा वीर सहाय्यता योजना – 2025 अंतर्गत विधी सेवा मदत कक्षाचे उद्घाटन आज, 8 ऑगस्ट रोजी करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन बी. एन. काळे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या हस्ते झाले. यावेळी सौ. एम. के. कुन्हे, अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण; बी. आर. खरात, अँड.; सौ. रोशनी अग्रवाल, अधिकारी मित्र; सुरज भोरने, अधिकारी मित्र तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील हरिभाऊ माने (कल्याण संघटक), गणपत संसारे, लिपिक आणि दिलीप ससाणे यांची उपस्थिती होती.

या कक्षाच्या माध्यमातून आजी/माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीर नारी, वीर माता-पिता यांच्या कायदेशीर किंवा न्यायालयीन अडचणी समजून घेणे, कायदेशीर सल्ला देणे तसेच आवश्यकतेनुसार सरकारी वकील उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती माननीय सचिव श्री. काळे यांनी दिली.

उद्घाटन प्रसंगी उपस्थित माजी सैनिक आणि वीर मातांनी या उपक्रमाचे स्वागत करत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सैनिक कल्याण कार्यालयाचे आभार व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande