अकोला, 7 ऑगस्ट (हिं.स.)।आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना येथे केलेल्या हिंदू खाटीक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल दुसऱ्या समाजाला कमी लेखण्याचा आणि हिनता दाखवल्यामुळे हिंदू खाटीक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात.. दरम्यान दोन समाजात भावना भडकवण्याचे काम आमदार खोतकर यांच्याकडून सुरू आहे.. हिंदू खाटी समाज हा अत्यंत शांत व संयमी असून मात्र बेताल वर्तन करणाऱ्या आमदार अर्जुन खोतकर यांनी आपल्या बुध्दीमत्तेचा उपयोग करून मागासवर्गीय समाजाला एका राजकीय वादविवाद विसंगतीतुन केलेले वक्तव्य हे अत्यंत हानीकारक आणि दुर्लभत्तेचे आहे.. त्यामूळे हिंदू खाटीक समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. दरम्यान यामुळे, आमदार अर्जुन खोतकर यांची विधानसभा सदस्यता रद्द करण्यात यावी व त्यांच्यावर ऍक्ट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी राज्यातून हिंदू खाटीक समाज करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे