‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर अकोल्यात संताप; बंदीची मागणी
अकोला, 7 ऑगस्ट (हिं.स.)।अकोल्यात ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटातील काही बाबींवरून शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, सैन्यात मुस्लिमांची टक्केवारी, अंगरक्षकांतील मुस्लिमांची संख्या आणि रायगडावर मशिद
P


अकोला, 7 ऑगस्ट (हिं.स.)।अकोल्यात ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटातील काही बाबींवरून शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, सैन्यात मुस्लिमांची टक्केवारी, अंगरक्षकांतील मुस्लिमांची संख्या आणि रायगडावर मशिद बांधल्याचे दाखवणाऱ्या दृश्यांमुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप आहे. अकोल्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेकडून जोरदार घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करून चित्रपटगृह चालकांनीही प्रदर्शन थांबवावे, अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला. निर्माते, दिग्दर्शक व लेखकांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी करत निषेध आंदोलनात कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande