पालघर, 7 ऑगस्ट (हिं.स.)।
पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या सोहम कल्पेश घरत (रा - सफाळे) याने मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात ‘मिस्टर युनिव्हर्सिटी’चा २०२४-२५’ हा मानाचा किताब पटकावत आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या या प्रतिष्ठित युवा महोत्सवात मुंबई आणि उपनगरातील जवळपास ३५० महाविद्यालयांमधून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विविध कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमधील एका महत्त्वाच्या जॅकपॉट इव्हेंटमध्ये सोहमने आपले प्रभावी सादरीकरण आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर बाजी मारली.
त्याच्या या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून, सर्वस्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL