सोलापूरमधील व्यापार्‍याची दोन लाख 23 हजारांची ऑनलाईन फसवणूक
सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील सम्राट चौकातील एका व्यापार्‍याची दोन लाख 23 हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे.कौस्तुभ विश्वनाथ करवा (वय 43, रा. सम्राट चौक, सोलापूर) यांची राहत्या घरी ऑनलाईन व्यवहार करण्याची फर्म आहे. दोन मोबाईल नंबरव
सोलापूरमधील व्यापार्‍याची दोन लाख 23 हजारांची ऑनलाईन फसवणूक


सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील सम्राट चौकातील एका व्यापार्‍याची दोन लाख 23 हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे.कौस्तुभ विश्वनाथ करवा (वय 43, रा. सम्राट चौक, सोलापूर) यांची राहत्या घरी ऑनलाईन व्यवहार करण्याची फर्म आहे. दोन मोबाईल नंबरवरून त्यांना ग्राहक असल्याचे भासवून त्यांच्याकडून दोन लाख 23 हजार रूपये घेऊन फसवणूक करण्यात आली. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande