लातूरमध्ये चोरीचा बनाव उघड, दोन आरोपींना अटक; ९.५ लाख रोकड जप्त
लातूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। पैशाची बॅग चोरीचा बनाव करणाऱ्या दोन आरोपींना लातूर पोलिसांनी अटक करून 9 लाख 50 हजारांची रोकड जप्त केली आहे. रत्नदीप सुभाष सोनकांबळे याने बॅग हिसकावून नेल्याची तक्रार दिली होती. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, फिर्यादीन
अ


लातूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। पैशाची बॅग चोरीचा बनाव करणाऱ्या दोन आरोपींना लातूर पोलिसांनी अटक करून 9 लाख 50 हजारांची रोकड जप्त केली आहे.

रत्नदीप सुभाष सोनकांबळे याने बॅग हिसकावून नेल्याची तक्रार दिली होती. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, फिर्यादीनेच आपल्या साथीदारांसोबत मिळून बनाव रचला होता.

या प्रकरणी अल्ताफ अमीन बडगिरे (बलसुर, उमरगा) आणि रत्नदीप सोनकांबळे (मीननगर, उमरगा) यांना अटक करण्यात आली असून विजय गायकवाड व सुरज कदम हे फरार आहेत. कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande