हदगाव आणि खड्का येथील सबस्टेशनसाठी अतिरिक्त विद्युत रोहित्र मंजूर
परभणी, 15 सप्टेंबर (हिं.स.)। पाथरी विधानसभा मतदारसंघातील हदगाव व खड्का येथील सबस्टेशन साठी अतिरिक्त पॉवर ट्रान्स्फफॉर्मर मंजूर झाले आहेत त्यामुळे ओव्हरलोड असलेल्या उपकेंद्रात आता अतिरिक्त वीज पुरवठा मिळणार आहे. पाथरी विधानसभा मतदार संघातील काही 33
हदगाव आणि खड्का येथील सबस्टेशनसाठी अतिरिक्त विद्युत रोहित्र मंजूर


परभणी, 15 सप्टेंबर (हिं.स.)।

पाथरी विधानसभा मतदारसंघातील हदगाव व खड्का येथील सबस्टेशन साठी अतिरिक्त पॉवर ट्रान्स्फफॉर्मर मंजूर झाले आहेत त्यामुळे ओव्हरलोड असलेल्या उपकेंद्रात आता अतिरिक्त वीज पुरवठा मिळणार आहे.

पाथरी विधानसभा मतदार संघातील काही 33 KV सबस्टेशन (उपकेंद्र) ओव्हरलोड झालेले असून सदरील सबस्टेशनवरून शेती पंपासाठी व घरगुती कनेक्शनसाठी होणारा विद्युत पुरवठ्यामध्ये वारंवार खंड पडत आहे. त्यामुळे मतदार संघातील भेटी दरम्यान जनतेकडून यावर उपाययोजना करण्या बाबत ची मागणी होत होती, सोनपेठ तालुक्यातील खड्का, पाथरी तालुक्यातील हदगाव, वाघाळा , मानवत तालुक्यातील पाळोदी, रामेटाकळी, व परभणी तालुक्यातील शिंगणापूर सबस्टेशनसाठी अतिरिक्त 5 MVA क्षमतेची विद्युत रोहित्रे तात्काळ स्वरुपात मंजूर करण्या बाबत आमदार राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव ऊर्जा यांना आदेशित केले होते. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात हदगाव व खड्का येथील सबस्टेशनसाठी नवीन अतिरिक्त पॉवर ट्रान्स्फफॉर्मर मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित सब स्टेशन साठी लवकरच अतिरिक्त पॉवर ट्रान्स्फफॉर्मर मंजूर होतील, अशी माहिती आ राजेश विटेकर यांनी दिली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande