रत्नागिरी : घरगुती गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा उदय सामंतांच्या हस्ते सन्मान
रत्नागिरी, 15 सप्टेंबर, (हिं. स.) : येथील कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि आयोजक कांचन मालगुंडकर यांच्या कार्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भरभरून कौतुक केले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा जयेश मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी सामंत म्
रत्नागिरी : घरगुती गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा उदय सामंतांच्या हस्ते सन्मान


रत्नागिरी, 15 सप्टेंबर, (हिं. स.) : येथील कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि आयोजक कांचन मालगुंडकर यांच्या कार्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भरभरून कौतुक केले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा जयेश मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी सामंत म्हणाले की, स्वतःच्या ताकदीवर अशी भव्य स्पर्धा घेणे जिकिरीचे आहे. रत्नागिरीतील युवापिढी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणाचा संस्कार जपण्याचा प्रयत्न करते. या संस्कारांना, त्यांच्यातील कलेला जपण्यासाठी सजावट स्पर्धा व बालमूर्तीकारांसाठी गणेशमूर्ती घडविण्याची स्पर्धा घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे निःस्वार्थ कार्य कांचन करत आहे. यासाठी त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. हेच कांचन याचे निःस्वार्थ कार्य असल्याचे द्योतक आहे. भविष्यात त्याने अशाच प्रकारे विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम घ्यावेत, त्यासाठी मी त्याच्या पाठीमागे सदैव उभा असल्याचा विश्वास श्री. सामंत यांनी बोलून दाखवला.

यावळी भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्ना सुर्वे व कांचन मालगुंडकर यांच्या हस्ते मंत्री उदय सामंत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला दिग्गज अभिनेता वैभव मांगले, अभिनेता पॅडी तथा पंढरीनाथ कांबळे, अभिनेत्री वीणा जामकर या सेलिब्रेटीनी विशेष हजेरी लावली. पॅडी कांबळे यांनीही कांचन यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. यावेळी सर्व विजेते, परीक्षक व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त आशीष वाडकर (15 हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र - श्री देव भैरी मंदिर देखावा, लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे), द्वितीय राहुल पाडावे व एकता परिवार (10 हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र - संत एकनाथ महाराज देखावा, मिरजोळे), तृतीय संतोष कूड (6 हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र - रेड्यामुखी वेद, संत ज्ञानेश्वर देखावा, पड्यारवाडी, गावखडी) यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय विविध वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.

दरवर्षी ही स्पर्धा होते. त्यामध्ये अनेकवेळा त्याच त्याच विजेत्यांना प्रथम क्रमांक मिळतो. त्यांच्या उत्कृष्ट कामामुळेच हा सन्मान त्यांना मिळतो. पण काहीवेळा थोड्या फरकाने यामुळे इतरांवर अन्याय होत असतो. त्यामुळे पुढील वर्षीपासून प्रथम क्रमांक विजेत्यांना दोन वर्षे स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे इतरांनाही प्रथम क्रमांक प्राप्त करण्याची संधी मिळेल, असे श्री. मालगुंडकर यांनी यावेळी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande