अकोला, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गलिच्छ, नालायक आणि अश्लील वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 'जोडो मारो आंदोलन' उभारण्यात आले.
हे आंदोलन अकोला येथे बस स्टॅन्ड चॊकात करण्यात आले,संबंधित , कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर, बॅनर आणि निषेधाच्या घोषणा देत संजय राऊत यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आ. अमोल मिटकरी यावेळी म्हटले की
राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांचे राज्यकारभार, आर्थिक शिस्त आणि सर्वसामान्यांसाठी असलेली बांधिलकी ही संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य केवळ अत्यंत खालच्या दर्जाचेच नव्हे, तर पक्षद्वेषातून प्रेरित आहे. असे उद्गार यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी काढले
पक्षाच्या युवक पदाधिकारी सह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले.
जर संजय राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घेतले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अमोल काळणे यांनी दिला..
या वेळी आंदोलन जिल्हाध्यक्ष बद्रुजमा यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या वेळी,महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, जिल्हा महासचिव विकास पवार, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष अरविंद पाटील, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष प्रकाश खाडे, सेवादल जिल्हाध्यक्ष विनोद कोगदे,कामगार कल्याण विभाग शुभम तिडके, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष उमेर अदनान, ज्येष्ठ नेते सदाशिव शेळके, विजय उजवणे,जिल्हा कोषाध्यक्ष श्रीकांत शिरसाठ, जिल्हाप्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे किशोर तेलगोटे, राहुल इंगोले, श्रीकांत पाटील, आकाश धवसे,बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष गणेश थोरात,बार्शीटाकळी शहर अध्यक्ष रिझवानबाबा,बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष आशिष पवार,बार्शीटाकळी तालुका उपाध्यक्ष विक्की लहरीया अकोला तालुकाध्यक्ष गणेश सांगळे, अकोला पूर्व विधानसभा अध्यक्ष, चेतन फुकट, अकोट तालुकाध्यक्ष धिरज गिते,तालुका कार्याध्यक्ष निखिल रोडे, अकोट विधानसभा अध्यक्ष राम वरणकार आदी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे