चंद्रपूर: दप्तरविना शाळा उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
चंद्रपूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे दप्तरविना शाळा हा उपक्रम शहरातील शाळांमध्ये उत्साहात राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे दप्तरा
चंद्रपूर: दप्तरविना शाळा उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


चंद्रपूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे दप्तरविना शाळा हा उपक्रम शहरातील शाळांमध्ये उत्साहात राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे दप्तरा विना शनिवार हा उपक्रम आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी घेण्यात येऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यापासून थोडी विश्रांती देऊन आनंदाने व खेळकर पद्धतीने शिक्षण घडवणे हा आहे.

शनिवार 13 सप्टेंबर रोजी मनपाच्या विविध शाळांत शब्द शोध कोडे ,समान वस्तू शोधणे,समान चित्रांमधील फरक शोधणे,शब्दकोडे सोडवणे,चित्र रंगवणे इत्यादी विविध रोचक उपक्रम विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना अधिक उत्साहवर्धक व सृजनशील अनुभव देण्यासाठी काही अनोखे उपक्रम देखील घेण्यात आले. त्यामध्ये डोळे बंद करून डोक्यावरील बाटली न पडता चालण्याचा खेळ,कृतीयुक्त गीत सादरीकरण,टोपी बनवणे,माझ्या जीवनातील मजेशीर प्रसंग या विषयावर लेखन करणे असे उपक्रम विविध शाळांत घेण्यात आले.

या सर्व उपक्रमांत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. खेळता-खेळता त्यांनी विचारशक्ती, निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास यांचा उत्तम वापर करून आनंद लुटला.

या प्रसंगी शाळांच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, दप्तरविना शाळेमुळे मुलांची शिकण्याची पद्धत बदलते. पुस्तकांच्या पलिकडे जाऊन विचार करणे, नवीन गोष्टी शोधणे आणि आनंदी वातावरणात शिकणे हेच आमचे ध्येय आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे आहेत. मुलांना दप्तराच्या ओझ्यापासून मुक्त करून खेळता-खेळता शिकविणे हीच खरी नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धती आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने व आनंदाने शिकतील, हे निश्चित. - उपायुक्त मंगेश खवले

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande